PFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी!


कट्टरतावादी संघटनांची मायावी रूपे : मोपला – खाकसार – रझाकार – SIMI – PFI – SDPI!!

विशेष प्रतिनिधी

देशभरात घातपती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी कट्टर इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हिच्यासह तिच्या 5 उपसंघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी घालताना केंद्र सरकारने विद्यमान कायद्यानुसार 5 वर्षांची मुदत ठेवून बंदीची विविध कारणे ही सांगितली आहेत. त्यामध्ये युवक, महिला, इमाम आदींवर प्रभाव निर्माण करण्यासाठी संघटना वाढविणे, विस्तार करणे याबरोबरच प्रामुख्याने फंडिंग गोळा करणे आणि त्याचा घातपाती कारवायांसाठी उपयोग करणे ही दिली आहेत. पण ही बंदी घातल्यानंतर एक भाग विसरता कामा नये, ती म्हणजे इस्लामी कट्टरता वादाची मायावी रूपे वेगवेगळ्या नावांनी देशात घातपाती कारवाया करत आली आहेत आणि देशात त्यांनी कट्टरता वादाचाच फैलाव केला आहे. याचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळा पासूनचा आहे. Though PFI is banned, don’t forget Islamic fundamentalist have tendency to change their names and operate

किंबहुना या इस्लामिक कट्टरता वाद्यांची “मोडस ऑपरेंडीच” मायावी रूपांनी समाजामध्ये कट्टरता फैलावण्याची राहिली आहे. त्यामुळे पी एफ आय सारख्या संघटनेवर बंदी घालून पाळीमुळे खणून काढताना नवनव्या मायावी रूपांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही किंबहुना पीएफ संघटनेतल्या अति वरिष्ठ मूर्ख यांनी ही बंदी गृहीत धरूनच आधीपासूनच काही विशिष्ट हालचाली केल्या असतील आणि ते लवकरच नव्या मायावी रूपात प्रकट होतील ही बाब नजरेआड करता येणार नाही अर्थात विद्यमान सरकारची सरकारचे त्यावर दुर्लक्ष त्याकडे दुर्लक्ष असेल असे अजिबात नाही पण हा संपूर्ण समाजासाठीच इशारा आहे की पी एफ आय सारख्या संघटनांवर फक्त बंदी घालून मूलभूत कट्टरतावादी प्रवृत्ती मिटवता येत नाहीत त्यासाठी मुळावर घाव घालावा लागतो.

कारण PFI वर एनआयए आणि ईडीने कायद्याचा बडगा चालविल्यानंतर उत्तरेतील काही मुस्लिम संघटनांनी या कायदेशीर कारवाईचे स्वागत केलेले दिसले, पण केरळमध्ये मात्र या कायदेशीर कारवाईचे हिंसक पडसाद उमटले होते, हे विसरता कामा नये. कट्टरतावादी मानसिकतेच्या अभ्यासातून ही बाब अधिक स्पष्ट होईल. किंबहुना या कट्टरतावादी संघटनांची मायावी रूपे नावे बदलून अनेकदा समोर आली आहेत, ती पाहिली तरी यातले “रहस्य” सर्वसामान्यांना उलगडेल!!

PFI बंदीची भाषा पण…

27 सप्टेंबर 2022 रोजी देशभरातल्या PFI बंदी घातली, तशीच बंदी स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात SIMI संघटनेवर घातली होती… पण म्हणून कट्टरतावाद्यांच्या कारवाया थांबल्या नव्हत्या. बंदी आणि नवनवीन नावे धारण करून समाजात इस्लामी कट्टरता फाईल होणे हे काही प्रवृत्तींचे काम फार पूर्वीपासूनच राहिले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिसून येतो.

मोपल्यांचे हिंदूंवर अत्याचार

कट्टरतावादी इस्लामी संघटनांची पाळेमुळे अगदी 1921 सालच्या मोपला बंडात देखील दिसली आहेत. प्रत्यक्षात केरळ मधल्या मलबार प्रांतातील मधल्या मोपला मुसलमानांचे बंड हा संपूर्ण हिंदू समाजाविरुद्धचा जिहाद होता. मोपला दहशतवाद्यांनी मलबार मध्ये हजारो हिंदूंचे बळी घेतले. हजारो हिंदूंना तलवारीच्या जोरावर इस्लाम कबूल करायला भाग पाडले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी “मोपल्यांचे बंड” या कादंबरीतून त्याचे स्वरूप तेव्हाच स्पष्ट केले होते. त्यानंतर देखील इतिहासाचे वास्तववादी संशोधन करणाऱ्या अनेक इतिहासकारांनी मोपला अत्याचाराच्या कहाण्या छापल्या आहेत पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी मोपल्यांच्या बंडाला ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचे रूप देऊन मोपला बंडखोरांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून दर्जा दिला होता. सन 2020 मध्ये हा दर्जा काढल्याचे दिसून येत आहे.

खाकसार, रझाकार

त्याचबरोबर संपूर्ण दक्षिण भारताचा विचार केला तर केवळ मोपला बंडखोरच नव्हे, तर हैदराबाद संस्थानांमधील खाकसार – रझाकार ही त्याचीच वेगळी मायावी रूपे होती. जिहादी मानसिकता हा या सर्वांचा मूलभूत विचाराचा घटक आहे. वास्तविक खाकसार ही संघटना इनायत उल्ला खान मशरकी यांनी लाहोर मध्ये स्थापन केली. तिचा प्राथमिक उद्देश ब्रिटिशांशी युद्ध करणे हा असल्याचे त्यावेळी सांगितले होते. पण ही संघटना अखंड भारतात बंदी घातल्यानंतर हैदराबाद संस्थानात फैलावली. तिचे राजकीय पक्षात रूपांतर केले गेले. हैदराबाद संस्थानात हिंदूंवरच्या अत्याचारांमध्ये खाकसार ही संघटना 1940 च्या दशकांमध्ये आघाडीवर होती. रझाकारांसारख्या हिंसक संघटनेला तिचा पाठिंबा सक्रिय होता.

सिमी संघटनेचा उदय, घातपाती कारवाया

1948 सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या पोलीस कारवाईनंतर मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि रझाकरांचा पराभव झाला. पण रझाकारांचा पराभव झाला असला तरी मूलभूत खाकसारी आणि रझाकारी प्रवृत्ती कधीच नष्ट झाल्या नाहीत. दक्षिण भारतातल्या हैदराबाद संस्थानच्या हद्दीत याच कट्टरतावादी प्रवृत्ती स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) SIMI संघटनेच्या नावाने ती पुन्हा उदयाला आली. कर्नाटकातल्या भटकळ गावात यासीन भटकळच्या रूपाने जुना हैदराबादचा रझाकरी कासीम रिझवी परत घातपाती कारवाया करू लागला… त्या एवढ्या की थेट मालेगाव बॉम्बस्फोटापर्यंत त्याच्या तारा जोडल्या गेल्या. त्यावेळच्या सरकारमध्ये असलेल्या विशिष्ट प्रवृत्तींमुळे मालेगाव बॉम्बस्फोटाचा संबंध हा तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांची जोडला गेला.

पण म्हणून फार काळ सत्य लपले नाही. मालेगावच काय पण मुंबई बॉम्बस्फोट आणि 2006 च्या दरम्यान झालेल्या दंगली यामध्ये देखील SIMI या कट्टरतावादी संघटनेचा हात असल्याचे सिद्ध झाले होते. SIMI वर त्यामुळेच तर बंदी घातली गेली. आज SIMI संघटना कायदेशीर दृष्ट्या बंदी घातले गेलेल्या संघटनांच्या यादीत समाविष्ट आहे. पण म्हणून SIMI ची मूलभूत कट्टरतावादी प्रवृत्ती मात्र नष्ट झालेली नाही. ती दक्षिणेतल्या प्रांतांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI च्या रूपाने पुन्हा उगवलेली दिसली आणि आता त्या पुढे जाऊन SDPI सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षात देखील तिचे रूपांतर झाल्याचे दिसत आहे. पी एफ आय वर बंदी जरूर आली आहे पण भविष्यात तीच मनोवृत्ती दुसऱ्या नावाने पुढे येण्याची दाट शक्यता आहे.

नाव लोकशाहीवादी काम कट्टरतावादी

वर उल्लेख केलेल्या सर्व कट्टरतावादी इस्लामी संघटनांचे दुसरे वैशिष्ट्य असे, की सुरुवातीच्या काळात त्यांची नावे उघडपणे इस्लामशी संलग्न असायची. मोपला, खाकसार, रझाकार या नावांमधून या संघटना नेमक्या कोणाशी आणि कशाशी संबंधित आहेत?, याचा खुलासा व्हायचा. पण कट्टरतावादी मायावी विचारसरणीने नंतर अशा पद्धतीने स्वतःचे रूपांतर करून घेतले, की ज्याच्या नावामधून मूळ उद्देशाचा खुलासाच होता कामा नये!! त्यामुळे मग पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI, सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया SDPI अशी नावे या कट्टरतावादी संघटनांनी स्वतःला घेतली. याचा अर्थ, “कारवाया घातपातीच, पण नावे मात्र लोकशाहीवादी” हेच ते इस्लामी कट्टरतावादी संघटनांचे मायावी रूप राहिले आहे!!

बंदी आली तरी…

PFI सारख्या संघटनेवर आता बंदी आली तरी कट्टरतावाद्यांचा नावे बदलण्याचा हा नवा पॅटर्न लक्षात घेतला तर त्यामध्ये असलेली मूलभूत कट्टरतावादी प्रवृत्ती PFI ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी लोकशाहीवादी नावाने पुढील येऊ घातल्यास आश्चर्य वाटायला नको… सावधानतेची जी नजर ठेवायची, ती त्या मायावी रूपांवर ठेवली पाहिजे…!!… कठोर कायदेशीर कारवाईचे दोर आणखी करकचून आवळले पाहिजेत!!… किंबहुना संपूर्ण समाजाने सावध राहिले पाहिजे.

Though PFI is banned, don’t forget Islamic fundamentalist have tendency to change their names and operate

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात