विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी भारताविरुध्दच गरळ ओकली आहे. काश्मीर हा एक वेगळा देश आहे, भारत आणि पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला आहे. काश्मीर काश्मीरच्या लोकांचा आहे, असा दावा माली यांनी ट्विट करत केला आहे.These are the advisers of Congress Punjab state president Sidhu, who says Kashmir has been illegally occupied by India and Pakistan.
माली यांच्या विधानामुळे प्रचंड टीका होत आहे. अकाली दलाचे नेते बिक्रम मजीठिया यांनी माली यांच्या ट्विटवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, त्यांचे वक्तव्य शहिदांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे. राहुल गांधींनी सांगावे की हे विधान शहीदांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे की नाही? जर राहुल गांधी हे सहमत असतील तर काँग्रेसचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल आणि जर तसे नसतील तर ते सिद्धूंवर काय कारवाई करतील.
अमरिंदर सिंग पंजाबमध्ये पाकिस्ताने अशांतता पसरवल्याचा आरोप करत आहेत, तर सिद्धू पाकिस्तानी लष्करप्रमुखांना मिठी मारताना दिसले होते. पाकिस्तान आणि काँग्रेसला समान वागणूक दिली पाहिजे,अशी टीका मजीठिया यांनी केली.
भाजप नेते विनीत जोशी म्हणाले, हे लोक पंजाबला कुठे घेऊन जात आहेत. काश्मीरसाठी अनेकजण हुतात्मा झाले. त्यांचे वक्तव्य म्हणजे शहिदांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे.सिद्धूंकडून मालींच्या ट्विटला कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
त्याचवेळी, सरकारचे प्रवक्ते आणि मुख्यमंत्री अमरिंदर यांचे निकटवर्तीय राजकुमार वारका यांनी माली यांना द्वेष पसरवू नका, असा सल्ला दिला. ते म्हणाले, मला वाटते काश्मीरचा मुद्दा संवेदनशील आहे. अशा टिप्पण्या टाळाव्यात. मला माहित आहे की त्यांनी कोणत्या संदर्भात, असे विधान केले आहे. परंतु त्यांनी मयार्दा लक्षात ठेवल्या पाहिजेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App