या १० दिग्गजांचेही झाले हवाई दुर्घटनेत निधन, संजय गांधी, माधवराव सिंधियांपासून ते दोन मुख्यमंत्र्यांचेही गेले होते प्राण


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. या घटनेनंतर अशा अपघाताच्या बऱ्याच जुन्या आठवणी वर येत आहेत. एस राजशेखर रेड्डी, संजय गांधी, माधव राव सिंधिया, जीएमसी बालयोगी, एस मोहन कुमार मंगलम, ओपी जिंदल, अरूणाचल प्रदेशचे चीफ मिनिस्टर दोरजी खांडू असे अनेक दिग्गज लोकांचे विमान अपघातामध्ये निधन झाले होते.

These 10 people had lost their lives in a plane / helicopter crash

1. 23 नोव्हेंबर 1963 रोजी जम्मू काश्मीर वरून निघालेल्या भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांच्या विमानाचा देखील अपघात झाला होता. यामध्ये 6 अधिकार्यांनी आपले प्राण गमावले होते. यामध्ये लेफ्टनंट जनरल दौलतसिंग, लेफ्टनंट जनरल विक्रमसिंह, एअर व्हाइस मार्शल एरलीक पिंटो यांचा समावेश होता.

2. इंडियन एअरलाइन्सच्या 440 नाव असलेल्या एका विमानाचा देखील अपघात झाला होता. या विमान अपघातामध्ये कॉंग्रेस लिडर मोहन कुमार मंगलम यांनी आपले प्राण गमावले होते. 31 मे एकोणीस 1973 मध्ये हा अॅक्सिडेंट झाला होता. कुमार मंगलम यांचे मृत शरीर त्यांच्या पार्कर पेनवरून ओळखण्यात आले होते.

3. पूर्व भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे देखील निधन एका विमान अपघातामध्ये झाले होते. त्यावेळी ते स्वतः हे विमान चालवत होते. 23 जून 1980 रोजी हा अपघात झाला होता. हा अपघात दिल्ली जवळ असणाऱ्या सफदरगंज एअरपोर्टच्या आसपासच झाला होता.

4. अरुणाचल प्रदेशचे माजी एज्युकेशन मिनिस्टर नटूनग यांचे देखील हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये निधन झाले होते. 2001 साली ही घटना घडली होती.

5. 30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचे निधन देखील हेलिकॉप्टर अपघातामध्ये झाले होते. खराब व्हिजिबिलिटी आणि पावसाचे वातावरण यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. ते त्यांच्या खाजगी विमानातून जात होते. 4 पत्रकार देखील त्यांच्यासोबत या अपघातामध्ये मारले गेले होते.


BIPIN RAWAT: सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा थरकाप उडवणारा व्हिडीओ …


6. 3 मार्च 2002 मध्ये उत्तर प्रदेश तेलुगू देसम पार्टीचे लीडर जीएमसी बालयोगी यांचे आंध्र प्रदेशमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे निधन झाले होते. खराब वातावरण हे या अपघातामागाचे कारण होते.

7. सप्टेंबर 2002 मध्ये केंद्रीय मंत्री आणि मेघालयमधील कम्युनिस्ट डेव्हलपमेंट मिनिस्टर सी संगमा यांचे निधन देखील हेलिकॉप्टर क्रॅश मुळे झाले होते. ते गुवाहाटीवरून शिलाँगला जात असताना हा अपघात झाला होता.

8. 31 मार्च 2005 रोजी हरयाणाचे पॉवर मिनिस्टर ओ पी जिंदाल यांचे निधन देखील प्लेन क्रॅशमध्ये झाले होते. नंतर केलेल्या परीक्षणावरून असे लक्षात आले होते की, त्या प्लेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उत्तर प्रदेशमधील सहरानपूर येथे हे विमान क्रॅश झाले होते.

9. 3 सप्टेंबर 2009 रोजी आंध्रप्रदेशमधील मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. हे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन एका जंगलात आढळून आले होते. 27 तासांच्या शोधानंतर त्यांचे मृत शरीर।सापडले होते.

10. या सर्व दुखद अपघातांमध्ये दगावलेले सर्वात मोठे नेते म्हणजे सुभाषचंद्र बोस होते. 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचे विमान क्रॅश झाले होते आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला होता.

These 10 people had lost their lives in a plane / helicopter crash

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”