वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीचा कोणताही तुटवडा नाही, देशात लसीचा मुबलक साठा असून दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे, असे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले आहे. There is no shortage of anti-corona vaccine in the country. Capacity to dose one crore people; Central Government’s explanation
विविध राज्यांकडून लसीचा तुटवडा असल्याचे लसीकरण करता येत नसल्याचे सांगितले आहे. परंतु आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती वेगळंच सांगत आहे. आयसीएमआरचे मुख्य संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, सध्या देशात लसींचा तुटवडा नाही.
जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत 1 कोटी नागरिकांना दररोज लस देण्याएवढा साठा देशात आहे. डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस दिलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. लसींच्या पुरवठ्याबाबत आणि लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत केंद्रानं केलेलं हे वक्तव्य पाहता देशात खरंच डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App