वृत्तसंस्था
कोलकत्ता : भवानीपूरमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. एकोणिसाव्या फेरीअखेर त्यांनी 54 हजार मतांची आघाडी घेतली आहे. कोलकत्यात ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी हिरवा गुलाल उधळून विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे. “There is no base of any other party other than TMC here. The party & Didi work for the people. We will form Govt in Delhi in 2024,” says CM’s brother Kartik
यामध्ये ममता बॅनर्जी यांचे बंधू कार्तिक बॅनर्जी यांनी भर घातली आहे. आम्ही 2021 मध्ये भवानीपूर जिंकले. आता 2024 मध्ये दिल्ली जिंकू, असा दावा कार्तिक बॅनर्जी यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सेलिब्रेशनमध्ये ते सहभागी झाले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव झालेला असेल आणि केंद्रात ममता बॅनर्जी यांचे सरकार असेल, असा दावा कार्तिक यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांचा विजय भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत होत आहे. पण त्यांचा डोळा आणि विजयाचा दावा दिल्लीवर आहे. पण भवानीपूरची पोटनिवडणुकीत यासाठी घ्यावी लागली की ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत नंदिग्राम मध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात हरल्या होत्या.
West Bengal: TMC workers & supporters celebrate in Kolkata as CM Mamata Banerjee leads in Bhabanipur Assembly bypoll "There is no base of any other party other than TMC here. The party & Didi work for the people. We will form Govt in Delhi in 2024," says CM's brother Kartik pic.twitter.com/yPgq6bPEUD — ANI (@ANI) October 3, 2021
West Bengal: TMC workers & supporters celebrate in Kolkata as CM Mamata Banerjee leads in Bhabanipur Assembly bypoll
"There is no base of any other party other than TMC here. The party & Didi work for the people. We will form Govt in Delhi in 2024," says CM's brother Kartik pic.twitter.com/yPgq6bPEUD
— ANI (@ANI) October 3, 2021
भवानीपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ आमदारांनी राजीनामा देऊन ती जागा मोकळी केली. त्यामुळे ममता बॅनर्जी पोटनिवडणूक घेऊन तेथे उभ्या राहू शकल्या. आता त्यांनी तेथे त्यांनी 54 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्याआधीच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा मार्ग दाखविला आहे. त्यामध्ये भर घालून कार्तिक बॅनर्जी यांनी 2024 मध्ये दिल्ली जिंकण्याचा दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App