सामंथा अक्कीनेनी- नागा चैतन्यने घेतला घटस्फोटाचा निर्णय


दोघांमधील नात्यांबद्दल मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. मात्र, दोघेही त्याबद्दल मौन धरून होते. अखेर समंथाने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.Samantha Akkineni- Naga Chaitanya decides to divorce


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्या यांच्या नात्याविषयी मागील काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा खरी ठरली आहे. समंथा आणि नागा चैतन्या घटस्फोट घेत आहे. अभिनेत्री समंथानेच सोशल मीडियातून ही घोषणा केली आहे.सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक असलेलं समंथा-नागा चैतन्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांमधील नात्यांबद्दल मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. मात्र, दोघेही त्याबद्दल मौन धरून होते. अखेर समंथाने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.समंथा अक्किनेनीने सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते.

समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्या यांनी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी लग्न केलं होतं. त्यांनी गोव्यात आधी हिंदू रिवाजाप्रमाणे आणि नंतर ख्रिश्चन प्रथेप्रमाणे विवाह केला होता.दोघे २०१० मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटात पहिल्यांदा भेटले होते. हे दोघेही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं सर्वात आयडल कपल मानलं जात होतं.

परंतु, त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले जात नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. असेही म्हटले जाते की, नागा चैतन्य बाळाचा विचार करत होता आणि त्यासाठी सामंथाने काही काळ चित्रपट करणे थांबवावे आणि कुटुंबाला पुढे न्यावे अशी त्याची इच्छा होती.लग्नानंतर समंथाने आपल्या नावासमोर अक्किनेनी नाव लावलं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक समंथाने सोशल हॅण्डलवरील अक्किनेनी आडनाव काढून टाकल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ६ ऑक्टोबर रोजी दोघांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण होणार होती. चार दिवसांआधीच समंथाने घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.

समंथा काय म्हणाली

‘खूप विचार केल्यानंतर मी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचे मार्ग वेगवेगळे असतील. आम्ही खूप नशिबवान आहोत की मागील एका दशकापासून खूप चांगले मित्र म्हणून राहिलो. तेच आमच्या नात्यातील महत्त्वाचं अंग राहिलं. तोच बंध आमच्यात कायम राहिल, यावर आमचा विश्वास आहे.’

समंथा पुढे म्हणते, ‘आम्ही आमच्या चाहत्यांना, शुभचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्यावी आणि यातून पुढे जाण्यासाठी आम्हाला प्रायव्हसी द्यावी. तुम्हा सगळ्यांच्या सोबतीसाठी आभार’, असं समंथाने म्हटलं आहे.

नागा चैतन्य काय म्हणाला

नागा चैतन्य याने त्याच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘खूप विचारविनिमय केल्यानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होत आहोत. आता आमच्या दोघांचे मार्ग वेगळे होत आहेत. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि पुढे जाण्यासाठी आमची प्रायव्हेट लाइफ तशीच राहू द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.’ तशाच आशयाची पोस्ट सामंथाने देखील तिच्या इन्स्टाग्रामवरू शेअर केली आहे.Samantha

Samantha Akkineni- Naga Chaitanya decides to divorce

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण