ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सरकारने केलेले काम अभूतपूर्व, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या टास्क फोर्सने केले केंद्र सरकारचे कौतुक


ऑक्सिजनची समस्या ही पायाभूत आहे. तरीही संकटाच्या काळात देशात ऑक्सिजन उत्पादन वाढविणे आणि पुरवठा करण्यात सरकारने केलेले काम हे अभूतपूर्व आहे, अशा शब्दांत सर्वोेच्च न्यायालयाने नेमलेल्या टास्क फोर्सने केंद्र सरकारचे कौतुक केलेआहे.The work done by the government on oxygen supply is unprecedented, the task force appointed by the Supreme Court praised the central government.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऑक्सिजनची समस्या ही पायाभूत आहे. तरीही संकटाच्या काळात देशात ऑक्सिजन उत्पादन वाढविणे आणि पुरवठा करण्यात सरकारने केलेले काम हे अभूतपूर्व आहे, अशा शब्दांत सर्वोेच्च न्यायालयाने नेमलेल्या टास्क फोर्सने केंद्र सरकारचे कौतुक केलेआहे.

देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रथितयश डॉक्टरांची टास्क फोर्स नेमली होती. त्याच्या पहिल्या बैठकीतच केंद्र सरकारने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.



या टास्क फोर्सने म्हटले आहे की गेल्या पंधर दिवसांत सरकारने याबाबत खूपच काम केले आहे. पंधरवड्यातच ऑक्सिजनच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पुरवठ्यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत १४ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी भारतात १०.१५ लाख सक्रीय रुग्ण होते. दररोज एक लाख नवे रुग्ण सापडत होते.

त्यावेळी राज्यांना सुमारे ३ हजार टन ऑक्सिजन पुरविला जात होता. १ मार्च २०२१ रोजी त्यामध्ये घट होऊन १३१८ टन ऑक्सिजनची देशाला गरज होती. मात्र, ९ मे पर्यंत ऑक्सिजनची मागणी वाढली.

तरीही केंद्र सरकारकडून ९ हजार मेट्रिकन टन ऑक्सिजन पुरविला गेला. ऑक्सिजनचा योग्य वापर व्हावा असे मतही या टास्क फोर्सने व्यक्त केले आहे.

The work done by the government on oxygen supply is unprecedented, the task force appointed by the Supreme Court praised the central government.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात