भारत पाकिस्तान बॉर्डरवर अडकून पडलेल्या ह्या स्त्रीने दिला बालकाला जन्म, नाव ठेवले ‘बॉर्डर’


 विशेष प्रतिनिधी

दिल्ली : पाकिस्तान मधून भारतात आलेल्या बऱ्याच हिंदू कुटुंबीयांना भारत पाकिस्तान बॉर्डरवर कागदपत्रांच्या पुर्ततेच्या अभावी रोखून ठेवण्यात आले आहे. याच एका कुटुंबातील निंबू ताई या स्त्रीने नुकत्याच एका लहान मुलाला जन्म दिला आहे. आणि तिने आपल्या मुलाचे नाव ‘बॉर्डर’ असे ठेवले आहे. कारण त्याचा जन्म भारत पाकिस्तान बॉर्डर झाला आहे. त्या 35 वर्षांच्या आहेत. निबु ताई, त्यांचे पती आणि त्यांची 5 मुले पाकिस्तानात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

The woman, who was stranded on the India-Pakistan border, gave birth to a baby, baby named ‘Border’

पाकिस्तानमधील हिंदू मागील वर्षी मार्चमध्ये म्हणजे लॉक डाऊन जाहीर होण्यापूर्वी हरिद्वार आणि जोधपूर येथे यात्रेसाठी आले होते. तर काही लोक 2018 मध्येच आले होते. या सर्वांचा व्हिसाचा कालावधी देखील संपलेला होता. तरीदेखील हे लोक पाकिस्तानमध्ये परत गेले नाहीत.


ट्विटरवरील छोटा युवराज सिक्सर मारणाऱ्या मुलाचा विडीओ व्हायरल


कागदपत्रांच्या अभावी जवळपास 100 लोकांना बॉर्डरवर अडवण्यात आले होते. त्यापैकी काही लोकांना कागदपत्रांच्या पूर्तते नंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण निंबू ताई आणि तिच्या कुटुंबीयांना मात्र तशी परवानगी देण्यात आलेली नाही. कारण नवजात बालकाची कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता झालेली नाहीये. नवजात बालकाच्या कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत लिंबू ताई आणि तिच्या कुटुंबियांना आता वाट बघावी लागणार आहे.

The woman, who was stranded on the India-Pakistan border, gave birth to a baby, baby named ‘Border’

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”