वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाचा फायदा भारतातही तेल कंपन्याना झाला आहे. राशियाकडून त्यांनी क्रूड तेल स्वस्तात खरेदीचा सपाटा लावला आहे.The war only benefits Indian companies; buys Russia cheap crude oil
इंडियन ऑइल कॉर्पोरेशननंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. नेही रशियाकडून २० लाख बॅरल स्वस्त क्रूड ऑइल (कच्चे तेल) खरेदी केले आहे.आयओसीप्रमाणेच एचपीसीएलनेही युरोपियन व्यावसायिक व्हेटोल यांच्यामार्फत रशियन युराल्स क्रूडची खरेदी केली.
याशिवाय मंगळूरची रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. (एमआरपीएल) या कंपनीनेही १० लाख बॅरल कच्चे तेल खरेदीची निविदा दिली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यामुळे पश्चिमेकडील देशांच्या निर्बंधामुळे अनेक कंपन्या आणि देश रशियाकडून तेल खरेदी टाळत आहेत.
यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले असून ते बाजारात मोठ्या सुटीसह उपलब्ध आहे. याचा लाभ घेण्याच्या उद्देशाने भारतीय रिफायनरी कंपन्यांनी क्रूड खरेदीच्या निविदा जाहीर केल्या आहेत. आयओसीने मागील आठवड्यात व्हिटोलकडून रशियन कच्चे तेल खरेदी केले. कंपन्यांना ते २० ते २५ डॉलर प्रतिबॅरल स्वस्त मिळाले आहे. एचपीसीएलने २० लाख बॅरल क्रूड खरेदी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App