जौनपूर जिल्ह्यातील गावाची अशीही ओळख, गावात ७५ घरे आणि ४७ आयएएस-आयएफएस अधिकारी


विशेष प्रतिनिधी

जौनपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच लागले आहेत. कोणत्या शहरातून किती अधिकारी झाले आहेत याची चर्चा होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील एक गाव चर्चेत आले आहे. जौनपूर जिल्ह्यातील माधापट्टी गावात उणीपुरी ७५ घरे आहेत. मात्र, येथे आत्तापर्यंत ४७ अधिकारी झाले आहेत. The village in Jaunpur district, 75 houses in the village and 47 IAS-IFS officers

जौनपूर जिल्ह्याचे नाव हिंदी चित्रपटात नेहमी येते. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर लोक मुंबई आणि महाराष्ट्रात रोजगारासाठी येतात. परंतु, माधापट्टी गावाने वेगळाच विक्रम केला आहे.

माधोपट्टी गावात अवघी 75 कुटुंबं राहतात. विशेष म्हणजे इथं घरटी एक आयएएस किंवा आयपीएस अधिकारी तयार होतो. या गावात जन्म घेतला, की मुलगा असो वा मुलगी, पुढे जाऊन अधिकारी होणार हे नक्कीच, असेही म्हटले जाते. उत्तर प्रदेशसोबत आजूबाजूच्या इतर राज्यांना या गावाने आतापर्यंत तब्बल 47 आयएएस अधिकारी दिले आहेत.

1914 साली या गावातल्या मुस्तफा हुसैन यांची निवड आयएएस अधिकारी म्हणून झाली होती. पीसीएमध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी काम केलं. याच काळात इंदुप्रकाश सिंह यांचीही आयएएस म्हणून निवड झाली होती. त्यांनी पुढे फ्रान्ससह अन्य अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलं.

इंदुप्रकाश सिंह यांचा संपूर्ण देशात तेरावा क्रमांक आला होता. त्यांच्यानंतर या गावातून आयएएस अधिकारी निवडले जाण्याची परंपरा सुरू झाली. त्यांचेच चार नातेवाईकही पुढे आयएएस अधिकारी झाले. या गावातल्या विनय सिंह यांनी बिहारचे माजी सचिव म्हणून कामकाज पाहिलं आहे. त्यांनी 1955मध्ये या परीक्षेत क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1965मध्ये त्यांच्या दोन भावांनीही या परीक्षेत यश मिळवलं.

या गावातल्याच उषा सिंह यादेखील आयएएस आॅफिसर झाल्या होत्या. यासोबतच, 1983मध्ये आयएएस झालेले चंद्रमौल सिंह यांच्या पत्नी इंदू सिंहदेखील त्याच वर्षी आयपीएस आॅफिसर झाल्या होत्या.गावातल्या अवघ्या 22 वर्षांच्या अमित पांडे यांची कित्येक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनमजय सिंह हे मनिलामध्ये वर्ल्ड बँकेत कार्यरत आहेत. तसंच, गावातले ज्ञानू मिश्रा हेदेखील भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये काम करत आहेत.

गावातील एकाच कुटुंबातील चार जणांनी आयएएस अधिकारी म्हणून काम केले आहे. विनय सिंह हे बिहारचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे दोघे भाऊ छत्रपाल सिंह, अजय कुमार सिंह आणि शशिकांत सिंह हे देखील आयएएस झाले. विशेष म्हणजे या गावात किंवा परिसरात एकही स्पर्धा परीक्षा क्लास नाही. मात्र, विद्यार्थ्यांमध्येच आयएएस होण्याची जिद्द आहे. येथील शिक्षक सांगतात की बारावीनंतरच येथील विद्यार्थ्यांकडे स्पर्धा परीक्षांची पुस्तके दिसायला सुरूवात होते.

The village in Jaunpur district, 75 houses in the village and 47 IAS-IFS officers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात