कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा प्रकारावरही अत्यंत प्रभावी : अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचा निष्कर्ष


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन हे अल्फा, डेल्टा कोविड-१९ च्या कोणत्याही प्रकारावर प्रभावीपणे कार्य करते, असे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने म्हटले आहे. कोव्हॅक्सिन डोस घेतलेल्या लोकांच्या रक्त चाचण्यांच्या दोन अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. The US National Institute of Health has said Covaxin “effectively neutralises” both Alpha and Delta variants of the coronavirus disease (Covid-19)

कोव्हॅक्सिनची निर्मिती भारतातील भारत बायोटेक कंपनीने केली आहे. हैद्रराबाद येथे लसीचे उत्पादन होते. ही कोरोना १९ विषाणूवर आणि त्यांच्या उपप्रकारावर जशे अल्फा, बीटा, डेल्टावर तितकीच प्रभावी आहे का ? याचा अभ्यास करण्यात आला. लसीचा दोनदा अभ्यास करण्यात आला. तेव्हा त्यांचे निष्कर्ष हे अत्यंत फायदेशीर असल्याचे दिसून आले आहेत.



एखाद्याला डोस दिल्यानंतर त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात आणि त्या अल्फा, डेल्टा व्हेरियंटवर तितक्याच प्रभावीपणे लागू होत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले. डोस दिलेल्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त सीरम काढून घेतले. एकदा नाही तर दोनदा केलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढले आहे. कोव्हॅक्सिन लसीचा अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर कोणता परिणाम होतो ? याचा अभ्यास अमेरिकन हेल्थ इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने संयुक्तपणे केला. त्यात हे सकारात्मक निष्कर्ष काढले आले आहेत.

The US National Institute of Health has said Covaxin “effectively neutralises” both Alpha and Delta variants of the coronavirus disease (Covid-19)

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात