कालीमातेचा अवमान : खासदार महुआ मोईत्रांच्या वक्तव्यापासून तृणामूळ काँग्रेसने हात झटकले, काँग्रेसचेही हात वर!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कालीमाता ही माझ्या दृष्टीने मांस आणि मदिरा स्वीकारणारी देवता आहे, असे संतापजनक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यापासून तृणमूल काँग्रेसने हात झटकले आहेत, तर काँग्रेसही हात वर करून मोकळी झाली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने मात्र महुआ मोईत्रांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. The Trinamool Congress shook hands with MP Mahua Moitra’s statement

इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये महुआ मोईत्रा यांनी लीना मणिमेकलाई हिच्या “काली” सिनेमाच्या पोस्टरचे समर्थन करताना माझ्या दृष्टीने कालीमाता ही मद्य आणि मांस स्वीकारणारी देवता आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून पश्चिम बंगालसह देशात संताप उसळल्याबरोबर तृणमळ काँग्रेसने महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यापासून आपले हात झटकून टाकले. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचा तृणामूळ काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून जाहीर केले.

– स्वरा भास्करचा पाठिंबा

दुसरीकडे महुआ मोईत्रा ज्या लिबरल जमातीच्या लाडक्या आहेत, त्यापैकी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने महुआ यांच्या वक्तव्याला ताबडतोब पाठिंबा देऊन टाकला. स्वतः महुआ यांनी तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलला अनफॉलो केले.

– तळमूळ आणि काँग्रेसची राजकीय अडचण

काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक म्हणून सिंघवी देखील काँग्रेसच्या वतीने महुआ मोईत्रांच्या वक्तव्याबद्दल हात वर करून मोकळे झाले. प्रत्येकाने सर्व धर्मीयांच्या प्रतिकांचा आणि भावनांचा आदर करावा, असे काँग्रेसला वाटते. महुआ मोईत्रांच्या वक्तव्याशी काँग्रेसचा काही संबंध नाही असे सांगून सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पश्चिम बंगालमध्ये कालीमाता अध्यात्मदृष्ट्या महत्त्वाची आहे. तसेच राजकीय दृष्ट्याही महत्त्वाची आहे. हे लक्षात आल्यामुळेच काँग्रेस आणि तृणामूळ काँग्रेस या दोन्ही पक्षांनी महुआ मोईत्रा यांच्यापासून हाताचे अंतर राखण्याचे ठरवल्यानंतर त्यांचा निषेध न करता बाजूला होणेच पसंत केलेले दिसते.

The Trinamool Congress shook hands with MP Mahua Moitra’s statement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात