देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला; कर्नाटकानंतर ओडिशामध्ये १३८ मुलांना संसर्ग


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात कर्नाटक आणि ओडिशात लहान मुलांना कोरोना झाल्याने चिंता वाढत आहे.The threat of a third wave of corona increased in the country; 138 children infected in Odisha after Karnataka

कर्नाटकाची राजधानी बंगळूरमध्ये गेल्या १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता ओडिशामध्ये १३८ मुलांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.



ओडिशात १ हजार ५८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात १३८ मुलांचा समावेश आहे. यामुळे रुग्णांचा आकडा ९ लाख ९४ हजार ५६५ पर्यंत पोचला आहे. मृतांची संख्या ६ हजार ८८७ झाली आहे. रविवारी ६४ जणांचा मृत्यू झाल. ६१६ रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवलं आहे. रुग्णवाढीचा दर १.५३ टक्क्यांवर आहे

खोर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ३७६ रुग्णांची नोंद झाली आहे. कटकमध्ये १६२, जाजपूरमध्ये ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे २७ जिल्ह्यात १०० हून कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. गजपतीत एकही रुग्ण नाही. खोर्धा जिल्ह्यात १६, कटकमध्ये १२, नयागरमध्ये १३ मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात रुग्णसंख्या ३६ हजारांच्या आसपास

देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र शनिवारी बाधितांमध्ये घट झाली. २४ तासांत ३६ हजार ८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी आजारावर वर मात केली.

The threat of a third wave of corona increased in the country; 138 children infected in Odisha after Karnataka

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात