कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागली, नव्या रुग्णांची संख्या कमी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्याचे आशादायी चित्र दिसत आहे. नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे धोका टळल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन देशातील सध्याच्या कोविड स्थितीबाबत तपशील दिला.The third wave of corona began to recede, reducing the number of new patients

ही आकडेवारी पाहता गेल्या दोन आठवड्यांत देशातील रुग्णसंख्येचा ग्राफ वेगाने खाली येताना दिसत असून तिसरी लाट नियंत्रणात येत असल्याचेच संकेत यातून मिळत आहेत. करोनाच्या दुसºया लाटेत भारतात मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले होते. भयावह स्थिती निर्माण झाली होती. त्या तुलनेत तिसºया लाटेत स्थिती तितकी गंभीर नसून याचा लेखाजोखा अगरवाल यांनी मांडला.



गेल्या २४ तासांत देशात १.७२ लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असून २१ जानेवारी नोंदवल्या गेलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत दैनंदिन आकडा निम्म्याने कमी झाला आहे. दोन आठवड्यांत चित्र पूर्णपणे बदलले आहे. २१ जानेवारी रोजी ३ लाख ४७ हजार २५४ रुग्ण आढळले होते

तर दोन आठवड्यांनंतर ३ फेब्रुवारी रोजी हाच आकडा १ लाख ७२ हजार ४३३ पर्यंत खाली आला आहे. कोविड पॉझिटिव्हिटी रेटही आता ३९ टक्क्यांवरून १०.९९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असे अगरवाल यांनी सांगितले.

रुग्णसंख्येचा ग्राफ खाली येत असला तरी सतर्क राहावं लागणार आहे. आठ राज्यांमध्ये अजूनही ५० हजारांच्या वर सक्रिय रुग्ण आहेत, १२ राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १० ते ५० हजारदरम्यान आहे तर १६ राज्यांमध्ये ही संख्या १० हजारांच्या खाली आली आहे. यात केरळमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत व तिथे अजूनही करोनाचा ग्राफ वाढता असल्याने ती चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

५० हजारांवर रुग्णसंख्या असलेल्या राज्यांत महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश ही अन्य सात राज्ये असून या सातही राज्यांत रुग्णसंख्येत सातत्याने घट पाहायला मिळत असल्याचे अगरवाल म्हणाले. देशातील एकूण ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा ग्राफ खाली येत आहे तर फक्त केरळ आणि मिझोरामध्ये नवीन रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी रेट वाढता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

The third wave of corona began to recede, reducing the number of new patients

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात