देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, आयसीएमआरने देशवासियांसाठी दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा सौम्य असल्याचे भारतीय वैद्यक परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले आहे.The second wave of corona is milder than the first, reassuring information from the Director General of ICMR
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, आयसीएमआरने देशवासियांसाठी दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा सौम्य असल्याचे भारतीय वैद्यक परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले आहे.
डॉ. भार्गव म्हणाले, स्पष्ट दिसत आहे की कोरोनाच्या नव्या लाटेत रुग्णांना फारसी लक्षणे दिसत नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आता अंगदुखी, डोकेदुखी, वा जाणे किंवा घशात खवखवणे यासारखी लक्षणे कमी प्रमाणात दिसत आहे. मात्र, या लाटेमध्ये श्वासोश्वासास त्रास होण्याचे प्रमाण गेल्या वेळीपेक्षा वाढले आहे.
दुसºया लाटेमध्ये तरुणांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले जात असली तरी त्यामध्ये फारसे तथ्य नाही. गेल्या वेळी कोरोना रुग्णांचे सरासरी वय ५० होते. आता तेथोडेसे कमी होऊन ४९ झाले आहे. या वेळीही ज्येष्ठांना कोरोनाचा धोका असल्याचे प्रमाण अधिक आहे.
गेल्या वेळी ० ते १९ वर्षे वयापर्यंतच्या रुग्णांचे प्रमाण ४.२ टक्के होते. ते आता ५.८ टक्के झालेआहे. २० ते ४० वयोगटातील गेल्या वेळी २३ टक्के रुग्ण होते.आता ते २५ टक्के आहे. चाळीसपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना कोरोना होण्याचे प्रमाण दोन्हीही वेळा ७० टक्केआहे.
सध्या लक्षणेविरहित रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये श्वासोश्वासाचा त्रास होत असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App