रिक्षाचालक बनला कुंभकोणमचा पहिला महापौर, शपथविधीसाठी रिक्षातूनच महापालिकेत

विशेष प्रतिनिधी

तंजावर : तामीळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम येथे २० वर्षांपासून रिक्षा चालविणारा रिक्षाचालक महापौर बनला आहे. महापौरपदाची शपथ घेण्यासाठी ते थेट रिक्षातून आले. के. सरवणन असे नवनियुक्त महापौरांचे नाव आहे. कॉँग्रेसने त्यांना महापौरपदाची संधी दिली आहे.The rickshaw driver became the first mayor of Kumbakonam

कुंभकोणम नगरपालिकेची नुकतीच महापालिका झाली आहे. त्यामुळे या शहराचे पहिले महापौर होण्याचा मान ४२ वर्षीय सरवणन यांना मिळाला आहे. तामीळनाडूतील २१ ही महापालिकांत द्रविड मुनेत्र कळघमने (दुमुक) विजय मिळविला आहे.



त्यापैकी एका ठिकाणी त्यांनी कॉँग्रेसला महापौरपद दिले आहे. कॉँग्रेसकडून पक्षाच्या एखाद्या वरिष्ठाकडे महापौरपद देण्याची शक्यता असताना सरवणन या रिक्षाचालकाला ही संधी देऊन धक्का दिला आहे.
सरवणन म्हणाले की, पक्षान महापौरपदासाठी े निवड केल्याने त्यांना धक्काच बसला.

तंजावर उत्तर काँग्रेस कमिटीचे जिल्हा नेते टी.आर. लोगनाथन यांनी मला जिल्हा कार्यालयात येण्यास सांगितले. कार्यालयात पोहोचल्यावर, कुंभकोणमच्या पहिल्या महापौरांचे स्वागत आहे,असे म्हणत त्यांनी माझे स्वागत केले. मी त्यांना सांगितले की मी फक्त एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे. पण ते म्हणाले की नेत्यांनी सांगितले की माझ्यात महापौरपदाचे गुण आहेत.

त्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष के. एस.अलागिरी यांनी माझे अभिनंदन केले . मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचाही फोन आला होता. त्यांनी मला विचारले की मी खरोखरच उदरनिवार्हासाठी ऑटोरिक्षा चालवतो का? मला संधी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

सरवणन दहावीपर्यंत शिकलेले आहेत. ते लहान असतानाच आई-वडीलांचे निधन झाले. त्यांचे पालनपोषण आजी-आजोबांनी केले. त्यांचे आजोबा टी.कुमारसामी यांनी १९७६ मध्ये कुंभकोणम नगरपालिकेचे सदस्य म्हणून काम केले. आजोबांच्या प्रेरणेने सरवणन यांनी २००२ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लवकरच त्यांना प्रभाग नेते आणि नंतर पक्षाच्या कुंभकोणम युनिटचे उपाध्यक्ष नेमण्यात आले.

सरवणन म्हणाले, जेव्हा मी २२ वर्षांचा होतो, तेव्हा मी तंजावर उत्तर काँग्रेस कमिटीच्या नेत्याला भेटलो आणि सांगितले की मला पक्षात सामील व्हायचे आहे. तेव्हापासून मी पक्षासोबत असून निवडणुकीच्या कामात सहभागी झालो आहे. अनेक वेळा आंदोलनात मला अटकही झाली आहे.

सरवणन हे पत्नी देवी आणि तीन मुलांसह थुक्कमपलायम येथे भाड्याच्या घरात राहतात. गेल्या २० वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवत आहे. कुंभकोणमचा कानाकोपरा त्यांना माहित आहे. शहरातील सर्वच्या सर्व ४८ वॉर्डातील लोकांशी यामुळे त्यांचा परिचय आहे.

The rickshaw driver became the first mayor of Kumbakonam

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात