मुंबईच्या महापौरांच्या भेटीनंतर दिशा सालियनच्या आईने सांगितले, दिशाच्या मृत्यूवरून राजकारण नको!!

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या आई आणि वडिलांची भेट घेतल्यानंतर दिशाच्या आईने माध्यमांसमोर आपली व्यथा व्यक्त केली. दिशा हिच्या मृत्यूमुळे आधीच आम्ही व्यथित आहोत. तिच्या मृत्यूचा मुद्द्यावरून आणखी राजकारण नको, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.Disha Salian’s mother said after the Mumbai mayor’s visit

दिशाच्या आत्महत्या प्रकरणाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे अन्य नेते राजकारण करत आहेत, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी करून महिला आयोगाला पत्र लिहिले होते. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबत ताबडतोब दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

त्यानंतर दिशाच्या मृत्यूशी सचिन वाझेचा काही संबंध आहे का? तिला ज्या ब्लॅक मर्सिडीस मधून नेले तशीच सचिन माझ्याकडे ब्लॅक मर्सिडीज आहे असा संशय व्यक्त करणारे ट्विट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील दिशाच्या मृत्यूबाबत 7 मार्च नंतर बरेच खुलासे होतील. कुणाला तुरुंगात जावे लागेल, हे नंतर कळेल, असा स्फोटक दावा कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत केला होता.

या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. यावेळी दिशाच्या आईने किशोरी पेडणेकर यांच्यासह पत्रकारांना संबोधित केले. दिशाच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर राजकारण होऊ नये. त्याचा आम्हाला मनस्ताप होतो आहे. मुंबईच्या महापौरांनी आमचे सांत्वन केले. आम्ही या प्रकारातून बाहेर पडत होतो. ज्यांना आम्ही मते दिली तेच दिशाच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत. हे बंद व्हायला हवे. दिशाच्या मृत्यूनंतर तिची बदनामी थांबायला हवी, असे वक्तव्य दिशाच्या आईने यावेळी केले.

Disha Salian’s mother said after the Mumbai mayor’s visit

महत्त्वाच्या बातम्या