लॉकडाऊनमध्ये १४०० किलोमीटर स्कूटर चालवून मुलाला परत आणले, आता युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाला कसे आणायचा असा आईपुढे प्रश्न


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : कोरोना व्हायरल महामारीच्या उद्रेकाच्या काळात २०२० मध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मुलाला घरी आणण्यासाठी तब्बल १,४०० किलोमीटर स्कूटर चालविली. मात्र, आता हिच आई युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला परत कसे आणावे या चिंतेत आहे.The mother was brought back after driving a 1400 km scooter in Lockdown, Now the question before the mother is how to bring the child trapped in Ukraine

तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिका रजिया बेगम यांचा मुलगा निजामुद्दीन अमन युक्रेनच्या सुमीमध्ये एमबीबीएस प्रथम वर्षात शिकतो. हा भाग रशियाच्या सीमेजवळ आहे. बहुतांश भारतीय विद्यार्थी सुमी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीशी संबंधित आहेत.



आपल्या मुलाला सुरक्षित परत आणावे, यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, राज्याचे गृहमंत्री महमूद अली यांना विनंती केली आहे. त्यांनी आपल्या मुलाला व अन्य भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणावे, असे त्यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आला होता, तेव्हा शेजारी राज्य आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात अडकलेल्या आपल्या मुलाला परत आणण्यासाठी रजिया यांनी १,४०० किलोमीटरचा प्रवास स्कूटरवरून केला होता. स्थानिक पोलिसांची परवानगी घेऊन त्या एकट्याच नेल्लोरला गेल्या होत्या व मुलाला घेऊन परतल्या होत्या.

रजिया यांनी सांगितले की, अमन बंकरमध्ये राहत आहे. त्याच्याशी फोनवर संपर्क होत आहे. तो सुरक्षित आहे व त्याची चिंता करू नये, हे सांगण्यासाठी त्याने फोन केला होता. तो ज्या ठिकाणी आहे, तेथील परिवहन संपर्क तुटलेला आहे.

The mother was brought back after driving a 1400 km scooter in Lockdown, Now the question before the mother is how to bring the child trapped in Ukraine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात