विशेष प्रतिनिधी
ग्वाल्हेर : ग्वाल्हेरचे महाराजा आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वत: रस्त्यावर उतरून हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. ग्वाल्हेरच्या इतिहासात प्रथमच शिंदे राजघराण्याच्या सदस्याने केलेल्या या जनेसवेच्या कृतिने नवा इतिहास घडविला आहे.The Maharaja of Gwalior took up the broom and made history with the work of Jyotiraditya Shinde
शनिवारी पहाटे ते वॉर्ड क्रमांक 58 मध्ये पोहोचले आणि झाडूने स्वत: तिथला रस्ता स्वच्छ केला. त्यावेळी त्यांनी हिरवा झेंडा दाखवून स्वच्छता अभियानाचा शुभारंभही केला. त्यांच्या हस्ते महाराजांच्या चाळीतल्या सफाई कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला. स्वत: रस्त्यावर झाडू मारुन ज्योतिरादित्य शिंदे यांनी नागरिकांना स्वच्छतेसाठी प्रेरित केलं आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये अनेक बदल केले आहेत. आपलं शहर देशातलं पहिल्या क्रमांकाचं शहर बनावं यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. नागरिकांचा स्वच्छता अभियाताील सहभाग वाढावा यासाठी ज्योतिरादित्य शिंदे स्वत: पुढाकार घेऊन नवनवीन उपक्रम राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे सध्या स्वच्छता महोत्सव साजरा केला जात आहे.
ग्वाल्हेरमध्ये वॉर्ड स्तरावर स्वच्छता महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. याचा उद्देश शहरात केवळ स्वच्छतेचं वातावरण निर्माण करणं हा नाही, तर खऱ्या अथार्ने स्वच्छता करण्याचा आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरुक करुन सर्वसामान्यांचा सहभाग वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
यासाठी विशेष व्यक्ती किंवा मोठा नेता संबंधित प्रभागात स्वच्छता रथ काढणार आहे. वॉर्ड क्रमांक 58 मध्ये काढण्यात आलेल्या अशाच एका स्वच्छता रथाला शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App