वृत्तसंस्था
हैदराबाद : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरुन मोहम्मद अझहरुद्दीन यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे. अझहरुद्दीनने क्रिकेट बोर्डाच्या काही नियमांचे उल्लंघन केले आहे,असा आरोप केला आहे. याबाबत एपेक्स कॉन्सीलने हा एकमुखी निर्णय घेतला आहे. The Hyderabad cricket board took a big decision about Mohammad Azharuddin
माजी कर्णधार अझहरुद्दीनविरुद्ध प्रलंबित प्रकरणे आहेत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. एचसीएस सदस्यांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारींची चौकशी पूर्ण होईपर्यत एचसीएसचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचेही म्हटलं आहे.
अझहरुद्दीन यांच्या नियुक्तीवर सदस्यांनी आक्षेप घेतला असून तक्रारी केल्या आहे. सदस्यांनी अझहरुद्दीन यांच्या काही निर्णयांना विरोध केला होता. सदस्यांना विचारत न घेताच, अध्यक्ष अझहरुद्दीन निर्णय घेतात, असाही आरोप ठेवला होता.
25 मे रोजी झालेल्या बैठकीतच अझहर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, 27 सप्टेंबर 2019 रोजी अझहरुद्दीन यांना अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App