आसाममध्ये आता दाढी – टोपी – लुंगीवाल्यांचे सरकार येईल; बद्रुद्दीन अजमल यांचे पुत्र अब्दुर रहीम अजमलचा जाहीर सभेत दावा

वृत्तसंस्था

गुवाहाटी – आसाममध्ये या विधानसभा निवडणूकीनंतर दाढी – टोपी – लुंगीवाल्यांचे सरकार येईल, असा खळबळजनक दावा ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांचे पुत्र अब्दुर रहीम अजमलने जाहीर सभेत केला आहे. The govt of the poor, the govt for development, govt of ‘dadhi-topi-lungi’ wallas & the govt of our daughter who wears ‘sindoor’

अब्दुर रहीम अजमल म्हणाले, की आसाममध्ये भाजपच्या जातीयवादी सरकारचा पराभव निश्चित असून पुढचे सरकार दाढी – टोपी – लुंगीवाल्यांचे आणि सिंदूर परिधान करणाऱ्या आमच्या मुलींचे असेल. हे सरकार गरीबांचे असेल. आम्ही आसामचा विकास करू.अजमल यांच्या पक्षाची काँग्रेसशी आघाडी असून ते आसाममध्ये प्रथमच आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. बद्रुद्दीन अजलम स्टेजवर असताना अब्दुर रहीम अजमलने हे वक्तव्य केल्याने काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अब्दुर रहीम अजमलच्या “दाढी – टोपी – लुंगी आणि सिंदूरवाल्या मुलींच्या” सरकारचा अर्थ काय, असे अनेक काँग्रेस नेते विचारू लागले आहेत. राज्यात बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाशी युती करू नये, हा विचार काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी मांडून अमलात आणून दाखविला होता. पण गोगोईंच्या निधनानंतर काँग्रेसचा विचार बदलला आणि त्यांनी अजमल यांच्या पक्षाशी युती केली आहे. काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांचा आजही या युतीला आतून विरोध आहे.

… आणि मतदान तोंडावर आले असताना अब्दुर रहीमने दाढी – टोपी – लुंगी सरकारचा उल्लेख करून काँग्रेसला अडचणीत आणले आहे. निवडणूकीच्या निर्णायक क्षणी भाजपच्या हातात प्रचाराचा मोठा मुद्दा यातून मिळाला आहे.

The govt of the poor, the govt for development, govt of ‘dadhi-topi-lungi’ wallas & the govt of our daughter who wears ‘sindoor’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*