अजमलसोबत निवडणूक लढवायला कॉँग्रेसल लाज वाटायल हवी, अमित शहा यांचा हल्लाबोल

भाजपप्रणीत सवार्नंद सोनेवालच्या सरकारने आसाममध्ये विकासाचे काम केले आहे. परंतु, काँग्रेसला येथे बदरुद्दीन अजमल सोबत निवडणूक लढवावी लागत आहे. जर राज्यात काँग्रेसच्या युतीची सरकार आले तर येथे घुसखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतील, त्यामुळे काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे की, ते अजमल सोबत निवडणूक लढवत आहे, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. Congress should be ashamed to contest elections with Ajmal Amit Shah’s attack


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : भाजपप्रणीत सवार्नंद सोनेवालच्या सरकारने आसाममध्ये विकासाचे काम केले आहे. परंतु, काँग्रेसला येथे बदरुद्दीन अजमल सोबत निवडणूक लढवावी लागत आहे. जर राज्यात काँग्रेसच्या युतीची सरकार आले तर येथे घुसखोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढतील, त्यामुळे काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे की, ते अजमल सोबत निवडणूक लढवत आहे, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना अमित शहा यांनी कॉँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधीवर निशाणा साधताना म्हटले की, मी राहुल गांधीला विचारु इच्छीतो की, एककडे तुम्ही आसामची प्रतिमा जपण्याची गोष्ट करता आणि दुसरीकडे अशा व्यक्ती सोबत निवडणूक लढवता जे घुसखोरीला प्रोत्साहन देतात. यामुळे आसामची प्रतिमा कशी जपणार?लोकांनी दहशतवाद किंवा विकास यापैकी एक निवडावे असे आवाहान करून शहा म्हणाले, पाच वर्षात आसाममध्ये एकही आंदोलन झाले नाही. आसाम एकेकाळी हिंसाचारग्रस्त राज्य होते. अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत होता. मात्र, भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हिंसाचाराच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. आता येथे कोणी बंदुकीमुळे मरत नाही. आसाममधील दहशतवाद संपवला गेला आहे.

Congress should be ashamed to contest elections with Ajmal Amit Shah’s attack

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*