शालेय विद्यार्थिनी असताना झाला होता सामूहिक बलात्कार, ३० वर्षांनंतर आजी झाल्यावरही सुरू सुनावणी, अजमेरमधील खादिम बंधूंचे सामूहिक बलात्कार प्रकरण

विशेष प्रतिनिधी

अजमेर: अजमेर शरीफ दर्ग्याच्या खादिम (संरक्षक) कुटुंबातील फारूक, नफीस, चिश्ती बंधू आणि त्यांच्या मित्रांच्या टोळीने अनेक मुलींवर केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी ३० वर्षांपासून सुरू आहे. शालेय विद्यार्थीनी असताना बलात्काराला बळी पडलेल्या एका महिलेने ३० वर्षांनंतर पुन्हा सुनावणी सुरू असताना आता मी आजी झाली आहे. माझ्या मुलाबाळांना काय सांगू असे म्हणत आता तरी एकटे सोडा अशी आर्त विनवणी न्यायालयात केली.The gang rape when she was a schoolgirl, Hearing continues even after 30 years when she became grandmother, case of gang rape of Khadim brothers in Ajmer

अजेमेर शरीफ दर्ग्याच्या खादिम कुटुंबातील आणि युवक कॉँग्रेसचे नेते असलेल्या या नराधमांनी मित्रांच्या सहाय्याने अनेक विद्यार्थीनींना धमक्या देऊन आणि ब्लॅकमेल करून अनेक महिने सामूहिक बलात्कार केले होते. एका फोटो लॅबने महिलांची नग्न छायाचित्रे छापली आणि ती प्रसारित करण्यात मदत केली.अजमेर येथे 1992 साली कुप्रसिद्ध सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले होते. अजमेर ब्लॅकमेल कांड म्हणूनही ते ओळखले जाते. मात्र, ३० वर्षे उलटून गेले तरी या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरूच आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे अजमेरमधील प्रत्येकालाच माहित होते. मात्र, अजमेर शरीफ दर्ग्याचे संरक्षक असलेल्या खादिम कुटुंबातील बड्या घरातील धेंडे आणि पुन्हा युवक कॉँग्रेसचे नेते असल्याने त्यांच्याविरुध्द बोलण्याचे धाडस कोणाला झाले नाही.

मात्र, पत्रकारांनी या घटनेचा पाठपुरावा केला. त्यामुळे शहरात धार्मिक तणाव निर्माण होऊन बंदही पुकारण्यात आला होता. स्थानिक माध्यमांमध्ये सुरूवातीला आलेल्या वृत्तानुसार आयएएस- आयपीएस अधिकाºयांच्या मुली असल्याचे म्हटले होते. परंतु, या मुली मध्यमवर्गीय सरकारी कर्मचाºयांच्या घरातील होत्या.

या घटनेमुळे अनेक कुटुंबांना शहर सोडून परागंदा व्हावे लागले.मात्र, तरीही या मुलींच्या मागचा दुर्दैवाचा फेरा चुकाला नाही. पोलीसांनी आपल्या नोंदीमध्ये पीडितांची नावे आणि सरकारी वसाहतीतील त्यांचे पत्तेही नोंदविले होते. माध्यमांपर्यंत त्यांची नावे पोहोचली. लोकांच्या कर्णोपकर्णी झाली.

या मुलींचे आणखी एक दुर्दैव असे की एखाद्या आरोपीला अयक झाल्यावर प्रत्येक वेळी खटला सुरू होतो. त्यामुळे पोलीस समन्स बजावण्यासाठी राज्याच्या विविध भागांत राहत असलेल्या या मुलींच्या घरी पोहोचतात. त्यातील बहुतांश मुलींची लग्ने झाली आहेत. अनेक जणी आजी झाल्या आहेत.

मात्र, ३० वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची जखम या समन्सने पुन्हा भळभळायला लागते. वकिलांच्या म्हणण्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 273 अन्वये न्यायालयाने आरोपीच्या उपस्थितीत पीडित व्यक्तीची साक्ष नोंदवावी लागते. आता ३० वर्षांनंतर तो भीषण प्रकार पुन्हा त्यांना आठवतो.

पोलीसही या सगळ्या प्रकारांना वैतागले आहेत. ते म्हणतात, आम्ही त्यांना किती वेळा कोर्टात बोलवणार? फोन केल्यावर अ नेक जणी आम्हालाच शिवीगाळ करतात. दारात पोलिस पाहिला की घाबरून जातात. यातील किमान तीन पीडितांनी कोर्टात जबाब नोंदवल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.

सप्टेंबर 1992 मध्ये खटला सुरू झाल्यापासून, पोलिसांनी सहा आरोपपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये 18 आरोपी आणि 145 हून अधिक साक्षीदारांची नावे आहेत. या काळात12 सरकारी वकील, 30 हून अधिक एसएचओ, बारा एसपी, डीआयजी, डीजीपी आणि राजस्थानमधील पाच सरकार बदल झाले आहेत.

अजमेर पोलिसांना 100 हून अधिक किशोरवयीन मुलींचे शोषण झाल्याचा पोलीसांचा अंदाज होता. मात्र, प्राथमिक तपासादरम्यान केवळ 17 पीडितांनी त्यांचे जबाब नोंदवले.हे प्रकरण जिल्हा न्यायालयातून राजस्थान उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, फास्ट ट्रॅक न्यायालय, महिला अत्याचार न्यायालयात गेले आहे आणि सध्या ते अजमेरच्या पॉक्सो न्यायालयात आहे.

The gang rape when she was a schoolgirl, Hearing continues even after 30 years when she became grandmother, case of gang rape of Khadim brothers in Ajmer

महत्त्वाच्या बातम्या