राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा ! छत्रपतींचे वंशज…गडकोटांचे राजे…संभाजीराजे जेव्हा रायगडाच्या झोपडीत विसावा घेतात !


  •  भर उन्हात दुपारी १२ वाजता संभाजीराजे दुर्गराज रायगडावर गेले. छत्रपती संभाजीराजेंचे व गडकोटांचे नाते हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे .

  • गडावर चाललेल्या विकास कामांची पाहणी करून गड सर करणारे छत्रपति .

  • रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत.

विशेष प्रतिनिधी

रायगड : छत्रपती संभाजीराजे यांचा एक फोटो व्हायरल होतोय. सर्वांना सुखद धक्का देणारा हा फोटो.होय फोटोतील व्यक्ती संभाजीराजेच…राजे या शब्दाला साजेस वर्तन …संभाजीराजेंच्या या साधेपणाचा प्रतयेकालाच अभिमान वाटतोय. एक राजघराण्याचा माणूस, छत्रपतींचा वंशज जेव्हा रायगडाच्या एका झोपडीत विसावा घेतो, तेव्हा ते दृश्य बघून अभिमान वाटणं हे साहजिकच आहे. सध्या संभाजीराजेंचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.The fort is very crowded when the king visits it! Descendants of Chhatrapati … Kings of Gadkot … When Sambhaji Raje rests in the hut of Raigad!

संभाजीराजे आज सकाळी रायगडावर तेथील सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांनी गडावरील कामकाजांची पाहणी केली. सध्या गडावरील रोप वे बंद आहे.

त्यामुळे संभाजीराजे पायऱ्या चढून त्यांनी सर्व कामांची पाहणी केली. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि रायगड सर करुन संभाजीराजे थकले. त्यांनी रायगडावर असलेल्या एका झोपडीत थोडावेळ आराम केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर झोपून विश्रांती घेतली.

संभाजीराजे यांचा रायगडावर एका झोपडीत विश्रांती करत असल्याचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर सोशल मीडियावर हे फोटो तुफान शेअर होत आहेत .

“राजे हा फोटो लाखों लोकांच्या काळजाचा विषय झाला आहे. सर्वसामान्य माणसामध्ये रमणारा राजा माणूस. गडकोटांच्या रक्षणाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत असणारे राजे . उन्हाच्या काहीलीमुळे थकून रायगडाच्या झोपडीच्या आश्रयाने थोडीशी विश्रांती घेताना पाहून राज्यातील जनता सुखावली”!

संभाजीराजे यांनी देखील आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर या दौऱ्याबाबत माहिती दिलीय. या माहितीसोबत त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत.

“आज सकाळी कोल्हापूरहून रायगडास निघालो. साधारण १२ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर नाणे दरवाजामार्गे गड चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. लॉकडाऊनमुळे रोपवे बंद आहे, अशा परिस्थितीत प्राधिकरणाचे अधिकारी दररोज गड पायी चढतात. रखरखत्या ऊन्हात देखील गडावरील सर्व कामे अविरतपणे सुरू आहेत. रायगड प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत असलेल्या मेहनतीस प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. वेळोवेळी रायगडास भेट देऊन सुरू असलेल्या कामांवर लक्ष देत असतो”, असं संभाजीराजे ट्विटरवर म्हणाले आहेत.

‘देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि’ हे बघून महाराज खुशीने म्हणाले… ‘तख्तास जागा हाच गड करावा’. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे.

गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.

राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.

The fort is very crowded when the king visits it! Descendants of Chhatrapati … Kings of Gadkot … When Sambhaji Raje rests in the hut of Raigad!

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात