विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : मुस्लिमांनी तृणमूल कॉँग्रेसलाच मतदान करावे असे आवाहन करणाºया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. या धार्मिक टिपणीबाबत ४८ तासांच्या आत खुलासा करावा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. आदर्श आचारसंहितेचे त्यांनी उल्लंघन केले असल्याचेही म्हटले आहे. The Election Commission slammed Mamata, in trouble for appealing to Muslims to vote
हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथील सभेत बोलताना ममतांनी मुस्लिम मतांचे विभाजन होण्यासाठी भारतीय जनता पक्ष इतर पक्षांना पैसे देत असल्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, माझी सर्व अल्पसंख्यांक बंधु-भगिनींना हात जोडून विनंती आहे की सैतानाचे ऐकू नका. अल्पसंख्यांक मतांना विभाजित होऊ देऊ नका.
भाजपाकडून पैसे घेतलेले अनेक प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करत आहेत. हिंदू- मुस्लिमांमध्ये धार्मिक मुद्यावर भांडणे लावत आहेत. सीपीआय आणि बीटीआय यांनी अल्पसंख्यांक मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपाकडून पैसे घेतले आहेत.
केंद्रीय अल्पंसख्यांक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ममतांच्या या धार्मिक वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.
आपल्याला मिळणारी मुस्लिमांची एकगठ्ठा मतं हातून निसटल्याचं ममतादीदींच्या लक्षात आले आहे. सर्व मुस्लिमांनी एकजूट झाले पाहिजे, मतांचं विभाजन होऊ देऊ नका, असं तुम्ही अलिकडेच म्हणाल्या होत्या. ममतादीदी तुम्ही सतत निवडणूक आयोगावर टीका करत असतात. जे तुम्ही मुस्लिमांच्या एकजुटीबद्दल बोलल्या तेच आम्ही सर्व हिंदूंनी एकजूट व्हावं, असं बोललो असतो तर निवडणूक आयोगाने आम्हाला ८ ते १० नोटीस बजावल्या असत्या, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कूचबिहार येथील सभेत बोलताना ममतांच्या वक्तव्यावर टीका केली होती. जे तुम्ही मुस्लिमांच्या एकजुटीबद्दल बोलल्या तेच आम्ही सर्व हिंदूंनी एकजूट व्हावं, असं बोललो असतो तर किती टीका झाली असती. देशातील सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि जगभरात लेख लिहून आमच्यावर बोचरी टीका केली गेली असती. पण याचा अर्थ मुस्लिम मतंही आपल्या हातून निसटल्याची खात्री ममतादीदींना झाली आहे.
मुस्लिमांची एकगठ्ठा मतं आपलीच, असं ममता मानत होत्या. आता मुस्लिमही तुमच्यापासून दूर गेले आहेत. तुम्हाला जाहीरपणे हे सांगावं लागतंय. यामुळे ममतादीदी तुम्ही निवडणूक हरल्या हे स्पष्ट होत आहे.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App