दिल्ली सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर ५०००० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : सध्या भारतात बऱ्याच भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. केरळ आणि उत्तर प्रदेश मध्ये पुरामुळे बरीच हानी झाली आहे. तर दिल्ली मध्ये देखील पावसाने आपला रंग दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मागे 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

The Delhi government has announced compensation of Rs 50,000 per hectare for crop damage caused by unseasonal rains

नुकसान झालेल्या पिकांचे  महसूल अधिकारी सर्वेक्षण करतील. त्या नंतर पुढील दोन आठवड्यांत ही प्रोसेस सुरू केली जाईल. हेक्टरी 50,000 रुपये दराने नुकसान भरपाई दोन महिन्यांत शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.


New Delhi : Chief Minister Arvind Kejriwal held first Cabinet meeting in the Delhi Secretariat today after government offices were allowed to be opened by the Delhi government from today.


या आधी जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावेळी देखील दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना मदत केली होती. यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसानभरपाई देखील दिली होती, जी आजवरची देशातील सर्वात जास्त दिली गेलेली नुकसान भरपाई आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

The Delhi government has announced compensation of Rs 50,000 per hectare for crop damage caused by unseasonal rains

 

महत्त्वाच्या बातम्या