विशेष प्रतिनिधी
बांकुरा : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसचा विजय झाला असला तरी भाजपाने राज्यातील आपला प्रभाव वाढविला आहे. त्याचबरोबर राजकारणात परिवर्तनाचे नवे पर्व सुरू केले आहे.The construction worker’s wife became MLA due to BJP, the victory of Chandana Baury who lives in a hut
प्रस्थापितांना बाजुला ठेऊन भाजपाने एका बांधकाम मजुराच्या बायकोला विश्वासाने उमेदवारी दिली. स्वत:ही मजुरी करणाऱ्या चंदना बाऊरी यांनी हा विश्वास सार्थ ठरवित विजय मिळविला आहे.
चंदना बाऊरी या तीस वर्षांच्या आहते. तीन मुलांची आई असून त्यांचे पती बांधकाम मजूर म्हणून काम करतात. राज्यातील सर्वात गरीब उमेदवार त्या होत्या. तीन गाय, तीन बकरी, एक झोपडी अशी अवघी 32 हजार रुपयांची संपत्ती आहे.
एका लहानशा झोपडीत राहणाऱ्या चंदना कधी कधी रोजगार हमीवर कामालाही जातात. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोष कुमार मंडल यांचा ४ हजार १४५ मतांनी पराभव केला होता.
चंदना सल्तोरा मतदारसंघात २०१४ पासून भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. २०१८ च्या पंचायत निवडणुकीत त्या पहिल्यांदा ग्राम पंचायत सदस्य बनल्या होत्या. तर २०१९ मध्ये चंदना बाऊरी या बांकुरा जिल्हा समितीवर सदस्य झाल्या.
चंदनाच्या मते, भाजपात श्रीमंत अथवा गरीब असा कोणताही भेद नाही. भाजपा सर्वांची आहे. भाजपाने मला सन्मान दिला त्यासाठी मी पक्षाची आभारी आहे.
भाजपाचं तिकीट मिळाल्यानंतर एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, मला याबाबत अजिबात कल्पना नहती. भाजपाच्या उमेदवारांच्या यादीत स्थानिक नेतृत्वाने चंदना बाऊरी यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सल्तोरा विधानसभा क्षेत्रात जाऊन चंदना यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता. त्यानंतर चंदना बाऊरी म्हणाल्या होत्या की, मिथून चक्रवर्ती यांच्याकडून माझ्या विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ होणे हे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना चंदना बाउरी बंगालमधील महिलांच्या आकांक्षेचे चित्र आहे, असे म्हटले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App