विश्वास ठेवा अगर नका.. ही आहे चंदना बावरी.. रोजंदारीवरील मजुराची पत्नी; पण आहे बांकुरा जिल्ह्यातील भाजपची उमेदवार!


पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात महिलांनीच एल्गार पुकारला आहे. बांकुरा जिल्ह्यातील सालतोरा मतदारसंघातू चंदना बाऊरी ही तीस वर्षांची युवती भाजपाकडून लढत आहे. चंदनाचे पती रोजंदारीवरील मजुर तीन शेळ्या, तीन गाई आणि एक मातीचे घर एवढीच त्यांची संपत्ती आहे. मात्र, चंदना यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून आर्थिक ताकदच उमेदवारीचा निकष नाही हे भाजपाने दाखवून दिले आहे. BJP nominates wife of dailly laborer in Bankura district


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात महिलांनीच एल्गार पुकारला आहे. बांकुरा जिल्ह्यातील सालतोरा मतदारसंघातू चंदना बाऊरी ही 30 वर्षांची युवती भाजपाकडून लढत आहे. चंदनाचे पती रोजंदारीवरील मजुर तीन शेळ्या, तीन गाई आणि एक मातीचे घर एवढीच त्यांची संपत्ती आहे. मात्र, चंदना यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून आर्थिक ताकदच उमेदवारीचा निकष नाही हे भाजपाने दाखवून दिले आहे.

चंदना यांचे पती सरबन हे रोजंदारी मजूर म्हणून काम करतात. दररोजची मजुरी चारशे रुपये आहे. मॉन्सूनच्या काळात मजुरांचा तुटवडा असतो त्यावेळी चंदनाही मजुरीला जातात. कधी कधी रोजगार हमीच्या योजनेवरही काम करतात. त्याच चंदना आता भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. अगदी कालपरवापर्यंत चंदना यांचे एकच स्वप्न होते ते म्हणजे घरात शौचालय बांधायचे.गेल्या वर्षी त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून ६० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यातून त्यांनी दोन खोल्या बांधल्या होत्या.गेल्या अनेक वर्षांपासून चंदना या भाजपाचे काम करत आहेत. मात्र, तरीही थेट विधानसभेची उमेदवारी मिळणे त्यांच्यासाठीही आश्चर्याचा धक्का होता. त्यामुळे दररोज सकाळी आठ वाजताच मॅटेडोरमधून भगव्या रंगाच्या साडीत त्या प्रचारासाठी बाहेर पडतात. त्यांचा मुलगाही सोबत असतो. चंदना म्हणतात, तृणमूल कॉँग्रेस अत्यंत भ्रष्ट आहे. त्यांनी कोणतेही विकासाचे काम केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून कल्याणकारी योजनांसाठी पाठविलेला निधीही तृणमूलच्या नेत्यांनी स्वत:च्या खिशात घातला. शौचालयापासून ते घर बांधण्यापर्यंत कोणत्याही कामासाठी तृणमूल कॉँग्रेसला कमीशन द्यावे लागते.

सालतोरा विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जातींसाठी राखीव आहे. तृणमूल कॉँग्रेसच्या स्वप्न बारुई यांनी गेल्या दोन वेळा येथून विजय मिळविला होता. मात्र, यंदाच्या वेळी तृणमूलने त्यांना नाकारून संतोषकुमार मंडल यांना उमेदवारी दिली आहे. चंदना सांगतात, आठ मार्च रोजी माझी उमेदवारी जाहीर झाल्याचे गावातील काही लोकांनी सांगितले. त्यांनी टीव्हीवरही बातमी बघितली होती.

चंदना यांचे पती सरबन हे पूर्वी फॉरवर्ड ब्लॉकचे कार्यकर्ते होते. मात्र, सरकार आल्यावर तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खूप त्रास दिला. त्यामुळे २०११ मध्ये सरबन आणि चंदना यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. चंदना यांनी पक्षात प्रगती करत उत्तर गंगाजलघाटी मंडलच्या महिला मोर्चाच्या सरचिटणिसपदापर्यंत मजल मारली.

चंदना यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्या म्हणतात, मला शिकायचे होते, परंतु दहावीत असतानाच वडीलांचे निधन झाले. त्यामुळे लग्न करावे लागले. अकरावीमध्ये असताना पती आजारी पडले.परंतु, तरीही पास झाले. बारावीत असताना गरोदरपणामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तृणमूल कॉँग्रेस पूर्ण अपयशी ठरले आहे. दररोज महिलांवर बलात्कार होत आहेत. हाच आपला प्रचाराचा मुख्य मुद्दा असल्याचे चंदना सांगतात.

BJP nominates wife of dailly laborer in Bankura district

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती