राजस्थानमधील काँग्रेस सरकार लवकरच वैदिक शिक्षण व संस्कार बोडार्ची स्थापना करणार आहे. बोडार्ची उद्दिष्टे, लक्ष्य आणि कामकाज यांबाबत आखणी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केल्यानंतर, राज्य सरकारने हा निर्णय घेतला.The Congress also remembered the ancient tradition and set up a Vedic Education and Sanskar Board in Rajasthan
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: राजस्थानमधील काँग्रेस सरकार लवकरच वैदिक शिक्षण व संस्कार बोडार्ची स्थापना करणार आहे. बोडार्ची उद्दिष्टे, लक्ष्य आणि कामकाज यांबाबत आखणी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केल्यानंतर, राज्य सरकारने हा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंजुरी दिल्यानंतर वैदिक शिक्षण बोडार्ची स्थापना केली जाईल, असे राजस्थान सरकारमधील संस्कृत शिक्षण खात्याचे राज्यमंत्री सुभाष गर्ग यांनी सांगितले. हा बोर्ड समितीच्या शिफारशींचा आधार घेऊन वैदिक ज्ञानाशी निगडित शिक्षण प्रारूपे स्वीकारेल.
२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने असा बोर्ड स्थापन करण्याचा तसेच संस्कृत भाषेला बढावा देण्यासाठी उपाययोजना करण्याचा वायदा केला होता. या बोडार्चे लक्ष्य प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील ज्ञानाचे पुनरुज्जीवन करणे आणि वेदांमधील ज्ञानाचा संबंध शास्त्र व योग यांच्याशी जोडणे हे आहे.
याबाबत पुढाकार घेऊन राज्यातील काँग्रेस सरकार यापूर्वीच्या भाजप सरकारच्या तुलनेत चांगले काम करत आहे. विद्यार्थ्यांना वेदांवर संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे उद्दिष्ट सरकारपुढे आहे असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जानेवारी महिन्यात म्हटले होते.
वेदांमध्ये उत्तम प्रशासनाच्या तत्त्वांचा खजिना आहे. या तत्त्वांचा अवलंब केल्यास कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल, अस मुख्यमंत्री गेहलोत यांनी जयपूर येथे राष्ट्रीय युवादिनानिमित्त आयोजित समारंभात सांगितले होते.
राजस्थानात सुमारे २० निवासी वैदिक शाळा आहेत. यांमध्ये गुरूकुलांचाही समावेश आहे. या शाळांमध्ये प्राचीन गुरू-शिष्य परंपरेचे अनुसरण केले जाते. या शाळा ट्रस्टद्वारे चालवल्या जातात आणि त्या कोणत्याही नियमित अभ्यासक्रमाचे अनुसरण करत नाहीत.
जानेवारी २०१९ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाखालील एका समितीने भारतीय शिक्षा बोर्डाच्या स्थापने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. हा नवीन शिक्षण बोर्ड वैदिक कल्पनांवर आधारित आहे. त्याचे उद्दिष्ट वैदिक शिक्षणाला नियमित स्वरूप देणे हे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App