विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नवजात बालकांना न्यूमोनियापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकार न्यूमोकोकल कॉन्जुगेट वैक्सीन (पीसीव्ही) लसीचे आठ कोटी डोस खरेदी करणार आहे. यासाठी केंद्र सरकारने जागतिक पातळीवर निविदा काढली आहे.The central government will buy eight crore doses of vaccine to protect newborns from pneumonia
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २०१७ पासून न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी योजनाबध्द रितीने पीसीव्हीचा कार्यक्रम सुरू केला. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम पाच राज्यांत राबविण्यात आला होता.
गेल्या वर्षी त्याचा विस्तार करून १४ राज्यांत हा कार्यक्रम सुरू झाला. आता पंतप्रधानांनी घोषणा केली आहे की देशातील प्रत्येक बालकाला या रोगापासून संरक्षण देण्यासाठी संपूर्ण देशात पीसीव्हीचा कार्यक्रम राबविला जाईल.
सरकारने दोन महिन्यांपूर्वी यूनिवर्सल इम्युनाइजेशन प्रोग्रामअंतगर्त न्यूमोकोकल कॉन्जुगेट वैक्सीन देण्याची घोषणा केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया म्हणाले की न्यूमोकोकसमुळे होणारा न्यूमोनिया हा बालकांमधील न्यूमोनियाच्या गंभीर आजाराचे महत्वाचे कारण आहे. देशशतील सुमारे १६ टक्के बालकांचा मृत्यू न्यूमोनियामुळे होतो. मात्र, पीसीव्हीचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम सुरू केल्याने मृत्यूच्या प्रमाणात ६० टक्के घट झाली आहे.
सरकारने सात कोटी ८० लाख पीसीव्ही डोस खरेदी करण्यासाठी जागतिक स्तरावर बोली जाहीर केली आहे. एप्रिल २०२२ आणि मार्च २०२३ मध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्य निगरानीखाली हा कार्यक्रम राबविला जाईल. जागतिक पातळीवरील टेंडरनुसार पुरवठा होणाऱ्या लसीच्या प्रत्येक बॅचची तपासणी कसौली येथील सीडीएच्या प्रयोगशाळेत होईल.
निविदेत म्हटले आहे की लसीची एक्सपायरिटी डेट सहा महिन्यांपेक्षा जास्त असायला नको. पीसीव्हीचे तीन डोस दिले जाणार आहे. यातील प्रत्येक डोस ०.५ मिलीचा असेल. सहा आठवडे, १४ आठवडे आणि नऊ महिन्याच्या वयात हा डोस दिला जाईल. भारतात आत्तापर्यंत फायझर आणि जीएसकेचे पीसीव्ही डोस आयात केले जात होते.
त्याची किंमत अनुक्रम ३८०१ रुपये आणि २१९५ रुपये इतकी आहे. हे डोस खरेदी करण्यासाठी गावी एलायंसने भारतालाम दत केली आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ने भारतात गेल्या वर्षी सर्वात स्वस्त पीसीव्ही डोसची घोषणा केली होती. सार्वजनिक बाजारात त्याची किंमत ३ डॉलर तर खासगी रुग्णालयात दहा डॉलर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App