केंद्र सरकारमधील बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदलाचा एक भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजले जाते. The Central Government has appointed Vikram Deo as the Chairman of Air India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी एअर इंडियामध्ये प्रशासकीय बदल केले आहेत.दरम्यान आयएएस अधिकारी विक्रम देव दत्त यांची एअर इंडिया लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दत्त हे AGMUT (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) कॅडरचे 1993 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.
काही दिवसातच एअर इंडिया कंपनीचे हस्तांतरण टाटा समूहाकडे जाणार आहे.केंद्र सरकारमधील बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदलाचा एक भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजले जाते.
एअर इंडियाचे सरकारकडून टाटा समूहाकडे हस्तांतरण डिसेंबरअखेर होणार होते.परंतु मधल्या काळात या संदर्भातील औपचारिक कामकाज शिल्लक राहिल्यामुळे आता हे हस्तांतरण जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App