मुंबई : १५०० रुपयात लस न घेता मिळाले कोरोना लसीकरणाचे बनावटी सर्टिफिकेट, दोन आरोपींना अटक


या आरोपींनी ७० ते ७५ जणांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान पोलीस या आरोपींकडून अधिक तपास करत ही लिंक कुठवर गेली आहे याचा शोध घेत आहेत. Mumbai: Fake corona vaccination certificate obtained without vaccination for Rs 1,500, two accused arrested


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोविड-१९ लसीकरणाची नोंदणी व प्रमाणपत्राची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची सहाद साजीक शेख (२१) आणि माविया अब्दुल हक भरणिया (२१) अशी नावे आहेत.

हे आरोपी लसीकरण न झालेल्या नागरिकांची १५०० रुपये घेऊन लस घेतल्याची अधिकृत नोंद करत होते. या नोंदणीचे प्रमाणपत्र देखील नागरिकांना देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.या आरोपींनी ७० ते ७५ जणांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान पोलीस या आरोपींकडून अधिक तपास करत ही लिंक कुठवर गेली आहे याचा शोध घेत आहेत.तसेच हे आरोपी गुजरात राज्यातून रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर मशीन आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

Mumbai: Fake corona vaccination certificate obtained without vaccination for Rs 1,500, two accused arrested

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात