लहान मुलांच्या कार्यक्रमात पंतप्रधानांची खिल्ली, तामीळ चॅनलला बजावली नोटीस


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : एका तामिळी चॅनलवरून प्रसारित होणाºया लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये नोटबंदीवर व्यंग करताना पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कपड्यांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला आहे. आता या प्रकरणी संबंधित चॅनलला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली असून, या प्रकरणी स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.PM’s mockery on children’s program, notice issued to Tamil channel

तामिळनाडूमधील भाजपच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर या चॅनला नोटीस पाठवण्यात आली आहे. सीटीआर निर्मल कुमार यांच्या तक्रारीनुसार ज्युनियर सुपर स्टार्स सीझन 4 नावाचा एक रिअ‍ॅलिटी शो झी तमिळवर प्रसारित केला जातो.



शनिवारी 15 जानेवारी रोजी प्रसारीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये दोन मुलांनी एक विनोदी नाट्य सादर केले. या नाट्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.निर्मल कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, या कार्यक्रमाचे अँकरिंग अभिनेत्री स्नेहा ही करत होती, तर आरजे सेंथिल आणि कॉमेडियन अमुधवन हे या कार्यक्रमाचे जज होते.

या कार्यक्रमामध्ये 14 वर्षांखालील दोन स्पर्धकांनी एका तामिळ चित्रपटाची थीम स्वीकारली होती. मात्र त्या थीमवर नाट्य सादर करताना नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांची खील्ली उडवण्यात आली. या प्रकरणी झी तामिळला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती निर्मल कुमार यांनी दिली आहे.

या प्रकरणी बोलताना माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाºयांनी सांगितले की, 15 जानेवारी रोजी आमच्याकडे या संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे आम्ही संबंधित चॅनलला नोटीस पाठवली असून, येत्या सात दिवसांच्या आत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

PM’s mockery on children’s program, notice issued to Tamil channel

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात