सीबीआयच्या दिल्लीतील मुख्यालयाला लागली अचानक आग


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली स्थित केंद्रीय अन्वेषण ब्युरो च्या मुख्यालय इमारतीला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. दिल्लीच्या लोधी रोडवर हे कार्यालय आहे.The CBI headquarters in Delhi caught fire suddenly

सकाळी जवळपास ११.३५ मिनिटांनी ही घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच सीबीआय इमारतीत काम करणारे सगळे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं बाहेर पडले. या आगीत कोणतेही नुकसान झालेले नाही.सीबीआय इमारतीतून येणाºया धुराच्या लोटांनी परिसरातील अनेक नागरिक धास्तावले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळविले.

वीजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक चौकशीत समोर येतंय. सीबीआय इमारतीच्या पार्किंग एरियामध्ये ही आग लागली होती.

सीबीआयच्या मुख्य कार्यालयात वेगवेगळ्या प्रकरणांचे महत्त्वाची कागदपत्रं असतात. त्यामुळे या आगीत काय नुकसान झालंय तसंच या आगीमागे नेमकं काय कारण आहे, याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.

The CBI headquarters in Delhi caught fire suddenly

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण