राजकारणापलिकडे जाऊन AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांनी कोरोना वाढीच्या कारणांवर नेमके ठेवले बोट… वाचा…


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात माणसे मरताहेत… आणि देशात राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करताहेत… या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी राजकारणापलिकडे जाऊन कोरोना वाढण्याच्या कारणांवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. The cause for the surge in COVID cases is multifactorial. But 2 main causes for that, says AIIMS Director Dr Randeep Guleria

कोविड प्रोटोकॉल पाळण्यात शिथिलता

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात, की कोरोना वाढण्याची दोन मुख्य कारणे आहेत… पहिले, साधारण जानेवारी – फेब्रुवारी २०२१ मध्ये लसीकरण सुरू झाले तेव्हा कोरोना केसेसच्या संख्येत घट झाली. पण त्याचवेळी लोकांमध्ये शिथिलता आली. कोरोना प्रोटोकॉल ज्या प्रमाणात पाळायला हवे होते, त्या प्रमाणात ते लोकांनी पाळले नाहीत.

कोरोना व्हायरस mutate

आणि नेमका त्याचवेळी कोरोना व्हायरस mutated झाला म्हणजे त्याच्यात परिवर्तन झाले आणि तो वेगाने पसरू लागला. सध्या देखील तो वेगाने पसरतोय. म्हणूनच आपण अधिक काळजी घेतली पाहिजे.

दुसऱ्या महालाटेचा सामना

आता देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या महालाटेचा सामना करतो आहे. वैद्यकीय व्यवस्थांवर आधीच ताण आला आहे. तरीही हॉस्पिटल बेड्स आणि अन्य सुविधा आपण वेगाने उभारण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण त्यालाही मर्यादा आहेत. लसीकरणाचा वेग वाढवून कोरोना पेशंट्सच्या संख्येत घट करण्याला सर्वाधिक प्राधान्य देतो आहोत.

धार्मिक सण – उत्सवांवर मर्यादा आणा

देशात धार्मिक सण – उत्सव जोरात सुरू आहेत. निवडणूका चालू आहेत. पण लोकांचा जीव त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. आपण सण आणि धार्मिक उत्सव मर्यादित प्रमाणात करू शकतो. आपणच त्यासाठी स्वतःवर मर्यादा घालून घेतली पाहिजे. म्हणजे कोविड प्रोटोकॉल पाळणे शक्य होईल, याकडे डॉ. गुलेरिया यांनी लक्ष वेधले आहे.

The cause for the surge in COVID cases is multifactorial. But 2 main causes for that, says AIIMS Director Dr Randeep Guleria

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात