वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या गरजूंसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशभरातील उत्पादक कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विक्रीच्या किमती (MRP) घटविल्या आहेत. On the intervention of the Government, the major manufacturers/marketers of ‘Remdesivir injection’ have reported voluntary reduction in Maximum Retail Price (MRP): Ministry of Chemical & Fertilizers
आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती देशभर ८९९ रूपये ते ३,४९० रूपये याच दरम्यान राहणार आहेत. त्यांची यादी आणि किमतीचा तक्ता केंद्रातल्या रसायन आणि खते मंत्रालयाने जारी केला आहे. या एकूण ७ कंपन्या आहेत, की ज्यांनी किमती घटविल्या आहेत.
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळा बाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App