राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा वाढलेल्या नितीश कुमारांना भाजपच्या मंत्र्याने जेडीयूची आमदारांची संख्या सुनावली


वृत्तसंस्था

औरंगाबाद, (बिहार) : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा वाढताच भाजपचे बिहारमधील मंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना त्यांच्या जेडीयू अर्थात संयुक्त जनता दल या पक्षाची आमदार संख्या त्यांना सुनावली. 42 आमदारांच्या बळावर नितीशकुमार यांना भाजपने मुख्यमंत्री होऊ दिल्याचे वक्तव्य सम्राट चौधरी यांनी बिहारच्या औरंगाबाद मध्ये केले. The BJP minister told Nitish Kumar about the number of JDU MLAs

ते म्हणाले, की बिहारमध्ये आपल्या योजना राबविण्यासाठी भाजप स्वतंत्र नाही. त्याच्यावर बंधने आहेत. 74 आमदार भाजपचे आहेत. परंतु भाजपच्या नेतृत्वाने 42 आमदारांच्या संयुक्त जनता दलाच्या नेत्यांना म्हणजे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली आहे. बिहारमध्ये एक – दोन नव्हे तर चार विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. त्यामुळे मर्यादा पडत आहेत. नितीश कुमार यांना भाजपने काही पहिल्यांदाच कमी आमदार संख्येवर मुख्यमंत्री केलेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर 40 पेक्षा कमी आमदारांमध्ये सुद्धा भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदी स्वीकारले, याची आठवण सम्राट चौधरी यांनी करून दिली.नितीश कुमार दोन दिवसांपूर्वी दिल्लीत होते. तेथे त्यांनी बिहार पुरत्या मर्यादित असणाऱ्या परंतु राष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी नितीशकुमार यांच्यावर “पंतप्रधानपदाचे मटेरियल” या शब्दांमध्ये स्तुतीसुमने उधळली. नितीश कुमार यांनी देखील ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची भेट घेतली. चौटाला यांनी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात दहा वर्षाचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. त्यानंतर नितीश कुमार यांनी चौटाला यांची भेट घेऊन यात काही राजकारण नसल्याचे म्हटले होते.

या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचे बिहारमधील मंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना त्यांच्या कमी आमदार संख्या सुनावून त्यांची राजकीय ताकद कमी असल्याचे दाखवून दिले आहे.

The BJP minister told Nitish Kumar about the number of JDU MLAs

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण