वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI वर बुधवारी केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवरील कारवाई कठोर केली असून PFI ला परदेशातून टेरर फंडिंग होत असल्याची माहिती चौकशीतून समोर येत असल्याने परदेशी खात्यांचाही तपास करण्यास आता सुरुवात केली आहे.Terror Funding to PFI: 500+ Bank Accounts in 6 Arab Countries on NIA’s Radar!!
500 हून अधिक खाती रडारवर
PFI ला जवळपास अर्धा डझन अरब देशांमधून आर्थिक मदत मिळत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या अरब देशांमधील लोकांची 500 हून अधिक बँक खाती तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आली आहेत. नोकरी + कामधंद्याच्या नावाखाली कामासाठी भारतातून अरब देशांत गेलेल्या लोकांकडून हे फंडिंग केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरमहा 5 ते 6 कोटींची मदत
केंद्रीय तपास यंत्रणांनी देशातील 15 राज्यांमध्ये पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणावर पुरावे हाती लागले आहेत. यावेळी एनआयने अनेक पीएफआय कार्यकर्त्यांना देखील अटक केली असून त्यांची चौकशी केली आहे. या चौकशीतून एक बाब सकृत दर्शनी पुढे आले असून त्यानुसार आखाती देशातून दरमहा 50 ते 60 कोटी रुपये पीएफआयला मिळत असल्याचे समोर आले आहे.
कोडवर्डद्वारे फंडिंग
तपास यंत्रणांना छापेमारीत अनेक कागदपत्रे आणि डायऱ्या मिळाल्या असून त्यामध्ये काही कोडवर्ड असल्याचे आढळून आले. तसेच या कुठल्या भागातून किती रक्कम आली याची देखील नोंद या डायऱ्यांमध्ये होती. या कोडवर्ड्सची उकल आता तपास यंत्रणा करत आहेत. पीएफआयच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या राज्यातील शाखांना सर्वाधिक आर्थिक रसद पुरवण्यात आल्याचेही तपास यंत्रणांच्या लक्षात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App