तात्पुरती रुग्णालये फिल्ड स्तरावर उभारण्यात यावी ; वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राचं राज्यांना पत्र


जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करणं आणि कोविड डेडिकेटेड हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्याचाही सल्ला दिला आहे. Temporary hospitals should be set up at field level; Centre’s letter to states due to increasing number of patients


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलत येत्या काळात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठीही तयारी सुरू केली आहे. केंद्रानं शनिवारी राज्यासाठी एक अॅडव्हायझरी जारी केली.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित, राज्यांना तात्पुरती रुग्णालये उभारण्याची प्रक्रिया सुरू करणं आणि या प्रकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी कंट्रोल रुम तयार करण्याची निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहे.



यासोबतच जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करणं आणि कोविड डेडिकेटेड हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्याचाही सल्ला दिला आहे. यामुळे तात्पुरती रुग्णालये फिल्ड स्तरावर उभारण्यात यावी. तसेच जिल्हा स्तरावर सर्व्हिलन्स सक्रिय करणं आवश्यक असल्याचंही पत्रात म्हटलं आहे.

Temporary hospitals should be set up at field level; Centre’s letter to states due to increasing number of patients

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात