TELANGANA …तर जीभ कापून टाकू ; CM चंद्रशेखर राव यांची भाजप नेत्यांना धमकी…


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद: इंधनाच्या किमती, केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भाजपवर टीका करताना जीभ चांगलीच घसरली . भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर अनावश्यक टीका केल्यास त्यांची जीभ छाटून टाकू असं वक्तव्य तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. TELANGANA:’We’ll cut your tongues’: KCR issues warning to Telangana BJP leaders

हैदराबादमध्ये बोलत असताना चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधात अत्यंत आक्रमक भूमीका घेताना दिसून आले. यावेळी त्यांनी आमच्यावर अनावश्यक टीका करू नका म्हणत भाजप कार्यकर्त्यांना धमकावले.तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्यावर हल्ला करतंय आणि केंद्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारलाही धारेवर धरलं आहे.

 

तसेच पूढे बोलताना ते असंही म्हणाले की, तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. भाजपने 7 वर्षात काय केले? भारताचा जीडीपी बांगलादेश, पाकिस्तानपेक्षा कमी आहे आणि केंद्राने विनाकारण कर वाढवला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल देखील केंद्र सरकार खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2014 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती 105 यूएस डॉलर होत्या आणि आता 83 यूएस डॉलर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्या असल्याचे सांगत भाजप जनतेशी खोटं बोलल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

TELANGANA:’We’ll cut your tongues’: KCR issues warning to Telangana BJP leaders

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती