ऑक्सिजनच्या तुटवड्यावर टाटा उद्योगसमुहाचा मदतीचा हात, पंतप्रधानांनी केले दयाळूपणाचे कौतुक

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत असल्यानं रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी टाटा उद्योग समूहाने मदतीचा हात पुढं केला आहे. Tata extends helping hand to oxygen shortage, PM appreciates kindness

ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा टाटा समूहानं केली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी टाटा समूहाचं कौतुक केलं असून, या उद्योगसमुहाचा हा दयाळूपणा अतिशय प्रशंसनीय असल्याचं म्हटलं आहे.



संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसगार्ची दुसरी लाट अत्यंत वेगानं पसरत आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली असून, सगळा देश या संकटाशी झगडत आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहानं जनतेच्या मदतीसाठी धाव घेतली असून, त्यांनी द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून टाटा समूहानं याबाबत माहिती दिली आहे. द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून 24 क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाइट्सने आयात करण्यात येत आहेत. देशातील आॅक्सिजनची कमतरता कमी करण्यास आम्ही मदत करत आहोत. कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला हातभार लावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे टाटा समूहानं म्हटलं आहे. तत्पूर्वी टाटा स्टीलच्या वतीनं दररोज 300 टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणाही करण्यात आली होती.

टाटा समूहाच्या या घोषणेनंतर काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं. टाटा समूहाचा हा दयाळूपणा आहे. आपण सगळे भारतीय नागरिक कोविड-19शी एकत्रितपणे लढा देऊ असं त्यांनी म्हटलं आहे.

टाटा समूहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचेही कौतुक केलं असून, कोविड-19 विरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी टाटा समूह सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे. टाटा उद्योग समूहानं याआधीही कोरोना संकटाशी लढण्याकरता 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Tata extends helping hand to oxygen shortage, PM appreciates kindness


महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात