वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री जयललिता जयराम यांचा बायोपिक थलयवीच्या प्रमोशनसाठी कंगना राणावत सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहे. तिने आज सकाळी चेन्नईतील मरिना बीचवर जयललिता यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला. Tamil Nadu: Actor Kangana Ranaut pays tribute at former Chief Minister J Jayalalithaa’s memorial at Marina Beach in Chennai, ahead of the release of her film ‘Thalaivii’, that is based on the former CM
कंगनाने जयललिता यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केले. थलयवी येत्या १० सप्टेंबरला म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी रिलीज होत आहे. पुढील ८ दिवस कंगना राणावत तामिळनाडूत विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये जाऊन थलयवी सिनेमाचे प्रमोशन करणार आहे.
कंगनाने थलयवी सिनेमात जयललिता यांची भूमिका साकारली आहे. तर बॉम्बे फेम अरविंद स्वामी यांनी तामिळ सुपरस्टार आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांची भूमिका साकारली आहे. थयलवीचा हिंदी अवतारही त्याच दिवशी देशभर प्रसारित होणार आहे.
Tamil Nadu: Actor Kangana Ranaut pays tribute at former Chief Minister J Jayalalithaa's memorial at Marina Beach in Chennai, ahead of the release of her film 'Thalaivii', that is based on the former CM. pic.twitter.com/Wb1puvjpgU — ANI (@ANI) September 4, 2021
Tamil Nadu: Actor Kangana Ranaut pays tribute at former Chief Minister J Jayalalithaa's memorial at Marina Beach in Chennai, ahead of the release of her film 'Thalaivii', that is based on the former CM. pic.twitter.com/Wb1puvjpgU
— ANI (@ANI) September 4, 2021
तामिळनाडू विधानसभा निवडणूकीत थलयवीचा ट्रेलर प्रसारित झाला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचा काहीसा लाभ जयललिता यांचा पक्ष अण्णा द्रमूकला देखील झाला आहे. अँटी इन्कम्बन्सीचा जो मोठा फटका बसणार होता. तो तेवढ्या प्रमाणात बसला नाही. तामिळनाडू विधानसभेत अण्णा द्रमूकचे 75 आमदार निवडून आले. यात थलयवी सिनेमाच्या ट्रेलरच्या टायमिंगचा मोठा वाटा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App