जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठ द्रमुक सरकारकडून बंद केले, अण्णा द्रुमुकचे आंदोलन

विशेष प्रतिनिधी

चेन्नइ : दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठ बंद करण्याचा निर्णय द्रविड मुनेत्र कळघमच्या (द्रुमुक) सरकारने घेतला आहे. हे विद्यापीठ अन्नामलाई विद्यापीठात समाविष्ठ करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या अण्णा दुमुकने सभात्याग केला. त्याचबरोबर ही लढाई रस्त्यावर लढण्यासाठी रास्तो रोकोही केले.Jayalalithaa’s university closed by DMK government, Anna DMK agitate

उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांनी जयललिता विद्यापीठाचा समावेश अन्नामलाई विद्यापीठात करण्याचे विधेयक मांडले. अण्णा द्रुमुकचे ओ पनीरसेल्वम आणि के पी अनबलगन यांनी याला विरोध केला. अण्णा द्रुमुकचा सहयोगी पक्ष असलेल्या भाजपनेही या निर्णयाला विरोध केला. पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली, एआयएडीएमकेच्या आमदारांनी विधानसभेचे कामकाज सुरू असलेल्या कलाईवनार अरंगम समोर वाल्लाजाह रोड अडवून आंदोलन केले.पत्रकारांशी बोलताना पनीरसेल्वम म्हणाले, द्रमुक सरकारने राजकीय सूडबुध्दीतून ‘अम्मा’ जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहें. त्यांच्या पक्षाने विधानसभेत प्रास्ताविक टप्प्यातच या निर्णयाला विरोध केला. ते म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री प्राथमिक आणि उच्च शिक्षणासह शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले होते.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनीमोफत लॅपटॉप सारख्या अनेक योजना आणल्या आहेत. अशा उपक्रमांमुळे तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांची एकूण नावनोंदणी प्रमाण दुप्पट झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत जयललिता यांनी कला, विज्ञान आणि कायद्याच्या विषयांसह 60 हून अधिक महाविद्यालये स्थापन करण्यात आली होती.

त्यामुळे त्यांच्या नावावर विद्यापीठाचे नाव ठेवणे योग्यच होते. ते त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील राजवटीत केले गेले.द्रमुक सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, अम्मांनीच अण्णामलाई विद्यापीठाला नवजीवन दिले होते. अण्णामलाई विद्यापीठ बंद पडू लागले होते

तेव्हा ते अम्मांनीच वाचविले होते. तामिळनाडूमध्ये शिक्षण क्षेत्रात पुर्नजागरण आणताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी विल्लुपुरम, तिरुचिरापल्ली आणि राणीपेटसह ठिकठिकाणी निदर्शने केली आणि त्यांनी डीएमके सरकारविरोधात घोषणा दिल्या.

Jayalalithaa’s university closed by DMK government, Anna DMK agitate

महत्त्वाच्या बातम्या