मुंबई विमानतळाचे मुख्यालय गुजरातला हलविण्याची चर्चा अफवाच, अदानी ग्रुपने केले स्पष्ट


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विमानातळाचे व्यवस्थापन गुजरातमधील अंदमानमध्ये हलविण्याचा आरोप होत आहे. या निमित्ताने गुजराती-मराठी संघर्षही तापविला जात आहे. मात्र, मुंबई विमानतळाचे मुख्यालय गुजरातला हलविण्याची चर्चा अफवाच असल्याचे अदानी ग्रुपने स्पष्ट केले आहे.Talks of shifting Mumbai airport headquarters to Gujarat are rumored, Adani Group clarified

काही दिवसांपूर्वी अदानी होल्जिंग्जनं मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाची जबाबदारी अदानी समुहाने घेतली आहे. त्यानंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्च लिमिटेडने आपले मुख्यालय गुजरातला हलवण्याचा निर्णय जाहीर केल्याचे बोलले जात होते. मात्र, मुंबई विमानतळाचे मुख्यालय गुजरातला हलवणार असल्याची चर्चा ही फक्त अफवा असल्याचे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



अदानी समूहानं आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये यांदर्भात खुलासा केला आहे. मुंबई विमानतळ मुख्यालय अहमदाबादला हलवण्यात येणार असल्याच्या अफवा सुरू झाल्या आहेत. मात्र, आम्ही ठामपणे सांगतो की मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाची मुख्यालयं मुंबईमध्येच राहणार आहेत. मुंबईकरांना गर्व वाटावा आणि आमच्या विमानतळ व्यवस्थेतून हजारोंसाठी रोजगार निर्माण व्हावा, यासाठीची आम्ही बांधील आहोत.

अदानी ग्रुपकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर आणि तिरुवंतपुरम विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोडोर्लोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत.

लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता.

लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षºया केल्या आहेत.

Talks of shifting Mumbai airport headquarters to Gujarat are rumored, Adani Group clarified

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात