तालिबानकडून उदारमतवादी चेहरा समोर आणण्याचे कसोशीने प्रयत्न


वृत्तसंस्था

काबूल : तालिबानच्या ताब्यात असलेल्या विधवा महिलांचा किंवा मुलीचा जबरदस्तीने विवाह लावला जाणार नाही. यासंदर्भात तालिबानने काल निर्णय जाहीर केला. तालिबानचा म्होरक्या हिबुतल्लाह अखुनजादा याने हा प्रस्ताव मांडला आहे. Taliban trying to clean their image

आंतरराष्ट्रीय पातळीवर तालिबानच्या सरकारला मान्यता मिळण्यासाठी तालिबानकडून उदारमतवादी चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न होत आहे. ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवले. परंतु चार महिन्यानंतरही तालिबानला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली नाही. जागतिक मदत थांबल्याने अफगाणिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.



यावर अखुनजादा याने एक निर्णय लागू केला असून महिला आणि पुरुष यांना विवाहाचा समान हक्क असून कोणावरही विवाहासाठी जबरदस्ती केली जाणार नाही किंवा प्रवृत्त केले जाणार नाही, असे म्हटले आहे. गरिबीमुळे आणि पारंपरिक रुढीमुळे विधवा महिलांचा पुनर्विवाह किंवा मुलीचा जबरदस्तीने विवाह लावणे ही अफगाणिस्तानची प्रथाच बनली आहे. अनेक जण आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी मुलींचे बळजबरीने विवाह लावून दिले जातात. तालिबानकडून अशा विवाहावर आता बंदी आणली आहे. विवाहाचे किमान वय किती असावे, हे स्पष्ट केले नाही. पूर्वी हे वय १६ होते.

Taliban trying to clean their image

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात