लालूंच्या राजद नेत्याने संघाची तुलना तालिबानशी केल्याने मोठा संताप; भाजप, जदयूच्या नेत्यांकडून कठोर शब्दांत समाचार


वृत्तसंस्था

पाटणा – तालिबान हे नाव नाही, ती अफगाणिस्तानमधील संस्कृती आहे. भारतातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने तशीच संस्कृती अस्तित्वात आहे, ही मुक्ताफळे दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून भारतातल्याच हिंदू नेत्याची आहेत. बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तालिबानी विचारसणीची संघटना असल्याचे मत लादले आहे. Taliban is not a name but a culture in Afghanistan and in India this RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) is Talibani

जगदानंद सिंह यांच्या वक्तव्यानंतर बिहार बरोबरच देशात मोठा वाद उफाळला आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी जगदानंद सिंह यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

काल पाटण्यात राजदच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना जगदानंद सिंह म्हणाले, की अफगाणिस्तानमध्ये तालिबान जे काम करत आहे तेच काम भारतात आरएसएस करत आहे. आरएसएसची वाईट विचारसरणी भारतीय संस्कृतीमध्ये फूट पाडण्याचे काम करते. असल्याचंही जगदानंद यांनी म्हटलं आहे. आरएसएस लोकांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करते. तालिबान हे नाव नसून एक संस्कृती आहे ती अफगाणिस्तानात आहे. आरएसएस हे भारतामधील तालिबानी आहेत. दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. संघाचे लोक बांगड्या विकाणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारतात. आपल्याला या लोकांना थांबवायला हवं. त्यांच्याविरोधात आपण पुढे येणे गरजेचे आहे.

 

राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती कारण ते आरएसएसच्या विचारसरणीच्या आधारे देशात फूट पाडू पाहत होते, याची आठवण जगदानंद सिंह यांनी करून दिली.

जगदानंद यांच्या या वक्तव्यावर भाजपाने कठोर शब्दांमध्ये प्रहार केला आहे. जो ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याप्रमाणे विचार करतो अशा शब्दात टोला लगावला आहे. पक्षाचे प्रवक्ते अरविंद सिंह यांनी राजद ज्या संस्कृतीचा पक्ष आहे त्यानुसार ते वक्तव्य करणार. जगदानंद अशाप्रकारचं वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांचे गुण आत्मसात करतो, असा टोला सिंह यांनी लगावला आहे.

सत्ताधारी जदयूचे प्रवक्ते अभिषेक झा म्हणाले, की जगदानंद डिरेल्ड झाले आहेत. बऱ्याच काळापासून पक्षाने त्यांचा छळ केलाय. कधी तेजस्वीमुळे तर कधी तेज प्रतापमुळे त्यांचा छळ झालाय. त्यामुळेच ते अशी वक्तव्य करत आहेत.

Taliban is not a name but a culture in Afghanistan and in India this RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) is Talibani

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात