वृत्तसंस्था
दोहा : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीला भारताने केलेली विकास कामे हवी आहेत, पण भारतीय सैन्याचे तिथले अस्तित्व नको आहे. भारताने अफगाणिस्तानसाठी धरणे बांधावीत. शाळा काढाव्यात. रस्ते, पूल बांधावेत. परंतु इथे भारतीय सैन्य ठेवू नये. आम्हाला त्यांच्याविरोधात शस्त्र उचलावे लागेल, अशी “डबल ढोलकी” तालिबानच्या प्रवक्त्याने वाजविली आहे. Taliban echoes double standard , accepts development works by India, but not Indian army presence
तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद सोहेल शाहिद शाहीन याने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तालिबानची भारताविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. तो म्हणाला, की भारताने अफगाणिस्तानमध्ये केलेली विकास कामे आम्हाला हवी आहेत. त्यांनी धरणे बांधलीत. त्याला आम्ही धोका पोहोचवणार नाही. रस्ते, उड्डाणपूल बांधलेत ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु त्यांनी आपले सैन्य इथे ठेवू नये. बाकीच्या देशांची अवस्था पाहावी आणि मग भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये सैन्य ठेवायचे का नाही याचा निर्णय घ्यावा, अशी धमकी मोहम्मद सोहेल शाहीन याने दिली.
अफगाणिस्तानमधील कोणत्याही देशांच्या दूतावासांना तालिबानची राजवट धक्का लावणार नाही, या वारंवार स्पष्ट केले आहे तरीही ते देश दूतावास बंद करत असतील त्याला आम्ही काय करायचे? असा सवाल त्याने केला. त्याच वेळी त्याने अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल् कायदा यांना काम करण्याची परवानगी असल्याचे त्याने स्पष्ट केले.
यातूनच त्याने भारताशी तालिबानचे असलेले वैर अधोरेखित केले. पण त्यातही त्याने भारताने केलेली विकास कामे चालतील पण भारतीय सैन्य नको, अशी “डबल ढोलकी” वाजवून घेतली.
तालिबान राजवटीच्या काही प्रतिनिधींशी भारताचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे चर्चा करत असतील तर त्याची माहिती नाही. परंतु दोहा येथे अमेरिका-रशिया अफगाणिस्तान पाकिस्तान आणि तालिबान यांच्या चर्चेत भारतीय प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती त्याने दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App