कोरोना महामारी आणि डेंग्यूच्या संसर्गादरम्यान आता दिल्लीत स्वाईन फ्लूनची एन्ट्री , ६० दिवसांत संसर्ग ४४ पट वाढला


सर्व आजारांची सुरुवातीची लक्षणेही जवळपास सारखीच असतात.अशा स्थितीत रुग्णांची वेळेवर तपासणी होत नसल्याने रुग्णालयांमध्येही गंभीर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.Swine flu outbreak in Delhi now rises 44 times in 60 days amid corona epidemic and dengue outbreak


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि डेंग्यूच्या संसर्गादरम्यान आता दिल्लीकरांसमोर आणखी एक नवीन समस्या उद्भवू शकते.ती समस्या म्हणजे दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ६० दिवसांत रुग्णांची संख्या ४४ पटीने वाढली असून, त्याबाबत सरकारलाही सतर्क करण्यात आले आहे.

कारण या सर्व आजारांची सुरुवातीची लक्षणेही जवळपास सारखीच असतात.अशा स्थितीत रुग्णांची वेळेवर तपासणी होत नसल्याने रुग्णालयांमध्येही गंभीर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) ने ३० सप्टेंबरपर्यंतच्या परिस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.त्यानुसार जुलैपर्यंत दिल्लीत फक्त दोन स्वाइन फ्लूचे रुग्ण होते.मात्र आता त्यांची संख्या ८८ झाली आहे.या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दिल्ली एम्सचे डॉ. नवल विक्रम सांगतात की, कोरोना व्हायरस, स्वाइन फ्लू आणि श्वसनाचे गंभीर आजार इत्यादींची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. अशा परिस्थितीत या रुग्णाला कोणत्या संसर्गाने ग्रासले आहे हे कळणे कठीण आहे.तसच अशा प्रकरणांमध्ये, थेरपी संशयाच्या आधारावर पुढे जाते आणि औषधांचा परिणाम देखील दिसून येतो.

जर एखाद्या रुग्णाला फ्लू किंवा श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दुसरीकडे आरएमएल हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे डॉ.अमित अग्रवाल सांगतात की, यावेळी सर्व प्रकारच्या आजारांवर आक्रमक वृत्ती दिसून येत आहे. रुग्णालयांमध्ये दिल्लीचे रुग्ण आहेत, तसेच आसपासच्या भागातील रुग्णही उपचारासाठी पोहोचत आहेत, ज्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे आयसीयू व इतर वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.

रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या अधिक

दोन महिन्यांत रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने राज्य सरकारने तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले आहे.तर एम्ससह विविध रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ झाली आहे. एम्स, सफदरजंग, आरएमएल, लेडी हार्डिंग, लोकनायक हॉस्पिटल, मॅक्स, अपोलो आणि फोर्टिस याशिवाय आकाश हॉस्पिटलमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वाइन फ्लूचे १२० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीत आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. ही दिलासादायक बाब असली, तरी अशाच लक्षणांमुळे रुग्णांची वेळेवर तपासणी होत नसल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. ताप, सर्दी, सुगंध कमी होणे, अंगदुखी, उलट्या, अशक्तपणा इत्यादी लक्षणे कोरोना, डेंग्यू किंवा स्वाइन फ्लूची शंका निर्माण करतात.

दिल्लीत स्वाइन फ्लू दर दुसऱ्या वर्षी वाढ

२०१६ पासून आतापर्यंतच्या परिस्थितीवर प्रसिद्ध झालेल्या या अहवालात दिल्लीत दर दुसऱ्या वर्षी स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचेही आढळून आले आहे.२०१६ मध्ये १९३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले होते मात्र त्यादरम्यान सात रुग्णांचा मृत्यू झाला होता.

यानंतर २०१७ मध्ये २८३५ प्रकरणे आणि १६ मृत्यूची नोंद झाली मात्र त्यानंतर २०१८ मध्ये रुग्णांची संख्या २०५ वर आली आणि दोन मृत्यूचीही नोंद झाली. त्यानंतर २०१९ मध्ये ही संख्या ३६२७ वर पोहोचली आणि ३१ लोकांचा मृत्यू झाला. यानंतर २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात ४१२जणांना लागण झाली होती मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Swine flu outbreak in Delhi now rises 44 times in 60 days amid corona epidemic and dengue outbreak

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात