विशेष प्रतिनिधी
जोधपूर : महानगरपालिकेची सफाई कर्मचारी म्हणून रस्त्यांची झाडलोट करणाऱ्या महिलेला राजस्थानमधील सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळाला आहे. आशा कंडारा (वय ४०) हिने ही अशक्यप्राय गोष्ट साध्य केली आहे. Swapper became officer in Rajstan
आशाला दोन मुले असून ती पतीपासून वेगळी राहते. संसार मोडल्यानंतर मुलांचा एकटीने सांभाळ करताना अनेक अडचणी आल्या. जातीभेदापासून लिंगभेदापर्यंत सर्व सहन केले, पण त्याचे दुःख न करता मी हिमतीने लढायचे ठरविले, असे तिने सांगितले.
विभक्त झाल्यानंतर आशा वडिलांबरोब राहू लागली. तेही जोधपूर महानगरपालिकेत काम करत होते. आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन मुलांना मोठे करण्याचे स्वप्न बाळगताना आशाने आधी शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले. ती २०१६ मध्ये पदवीधर झाली.
महापालिकेची सफाई कामगाराची परीक्षा ती २०१८ उत्तीर्ण झाली आणि ती शहरातील रस्ते झाडण्याचे काम करू लागली. हे काम करतानाच तिने ‘आरएएस’च्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. ऑगस्ट २०१८मध्ये प्राथमिक परीक्षेत यशस्वी झाल्याने अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी तिला बळ मिळाले. आता ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आशावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जोधपूरच्या महापौरांनी तिचा सत्कार केला.
हत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App