विशेष प्रतिनिधी
लखनऊ : योगी आदित्यनाथ सरकारमध्ये दलीत, ओबीसींना वंचित ठेवल्याच आरोप करत भाजपचे मंत्री स्वामी मौर्य यांनी पक्ष सोडला असला तरी प्रत्यक्षात स्वत:ला आणि मुलाला विधानसभेचे तिकिट मिळण्याची खात्री नसल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.Swami Maurya quits BJP as Dalit, OBCs pretend to be happy
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ‘मी भाजपला लाथ मारली आहे, परत जाण्याचा प्रश्नच येत नाही’, असे ते म्हणाले. मी आज आणि उद्या समर्थकांशी बोलून चर्चा करेन. यानंतर मी निर्णय घेईल आणि आपले पुढील राजकीय पाऊल काय असेल, हे १४ तारखेला जाहीर करेन असे’, असे त्यांनी सांगितले आहे.
मात्र, उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घराणेशाहीवर वार करत आहे. मौर्य स्वत: मंत्री आहेत. त्यांची मुलगी संघमित्रा खासदार आहे आणि आता ते मुलासाठीही विधानसभेचे तिकिट मागत आहे. मात्र, स्वामीप्रसाद मौर्य यांनाच यावेळी तिकिट मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मौर्य यांचा पक्षांतरांचा इतिहास राहिला आहे. बहुजन समाज पक्षात असताना ते मायावती यांचे अतिशय निकटवर्तीय होते.मात्र, २०१६ मध्ये त्यांनी हवेची दिशा ओळखून भाजपामध्ये प्रवेश केला होता. योगी सरकारमध्ये दलित आणि ओबीसी वगार्ला वंचित ठेवले जाते. यांवर नाराज होऊन भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App